मेहकर तालुक्यातील ९८ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:32 IST2021-02-05T08:32:15+5:302021-02-05T08:32:15+5:30

मेहकर तहसील कार्यालयात सकाळी ११ वाजेच्या दरम्यान सरपंचपदाची आरक्षण सोडत प्रक्रियेला सुरुवात झाली. यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी,नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य ...

Leaving reservation of 98 gram panchayats in Mehkar taluka announced | मेहकर तालुक्यातील ९८ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत जाहीर

मेहकर तालुक्यातील ९८ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत जाहीर

मेहकर तहसील कार्यालयात सकाळी ११ वाजेच्या दरम्यान सरपंचपदाची आरक्षण सोडत प्रक्रियेला सुरुवात झाली. यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी,नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते. मेहकरचे तहसीलदार डॉ.संजय गरकल यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सोडतीमध्ये आरक्षण निश्चित करण्यात आले. २०२० ते २०२५ करीता आरक्षणाच्या चिठ्ठ्या उचलण्यात आल्या. या सोडतीनुसार अनुसूचित जमातीसाठी पिंपळगाव उंडा, परतापुर,सुकळी,बाऱ्हई,आरेगाव,पांगरखेड तर अनुसूचित जाती करीता उसरण,कल्याणा,थार बरदापूर, द्रगबोरी, दुधा, पेनटाकळी, परडा, पारखेड, लोणी, वडगाव माळी,हिवरखेड,मारोती पेठ,गोमेधर,हिवरा खुर्द,जवळा,नायगाव दत्तापुर,सावत्रा,सारशिव,शिवाजी नगर,शेलगाव काकडे,उमरा.

नागरिकांचा मागास प्रवर्गकरिता कंबरखेड, पिंप्रीमाळी,बदनापूर,बाभुळगाव,भालेगाव,भोसा,मिस्कीनवाडी,लोणी काळे,साब्रा,हिवरा साबळे,वागदेव,जानेफळ,अंजनी बु,बोथा,ब्रह्मपुरी,डोणगाव,देऊळगाव साकर्शा,घाटनांद्रा, मादणी,मोळा,नागापूर,शेलगाव देशमुख,विश्वी, मांडवा फॉ, सोनाटी, बोरी.

सर्वसाधारण गटासाठी जनुना,माळेगांव,कनका बु,अकोला ठाकरे,आंधृड,अंत्री देशमुख,उटी,कळपविहीर,खंडाळा,घुटी,चिंचोली बोरे,नायगांव देशमुख,वरटाळा,मोळी,मुंदेफळ,लव्हाळा,वडाळी,वर्दडा,वरवंड,वर्दडी वैराळ, सारंगपूर, सोनारगव्हाण, विठ्ठलवाडी, कळंबेश्वर घाटबोरी, बेलगाव, देऊळगाव माळी,दादुलगव्हाण ,फैजलापूर, गजरखेड, गोहोगाव,गणपूर,कासारखेड,लावणा,लोणी गवळी,मांडवा समेत डोंगर,मोहना बु, मोहना खुर्द,शहापूर,सांगवीवीर,शेंदला,विवेकानंद नगर,वरूड या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

Web Title: Leaving reservation of 98 gram panchayats in Mehkar taluka announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.