नेत्यांचे इनकमिंग, आऊटगोईंग सुरूच

By Admin | Updated: October 2, 2014 23:42 IST2014-10-02T23:42:23+5:302014-10-02T23:42:23+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. रामदास भोंडे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश.

Leaders of Incoming, Outgoing | नेत्यांचे इनकमिंग, आऊटगोईंग सुरूच

नेत्यांचे इनकमिंग, आऊटगोईंग सुरूच

बुलडाणा : आज बुलडाणा येथे झालेल्या भाजपच्या जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती त राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. रामदास भोंडे यांच्यासह शिवसेनेचे अशोक गव्हाणे, काँग्रेसचे मो. सोफियान व शेकडो मुस्लिम कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. महायुती व आघाडी तुटल्यानं तर राज्यभरात नेते व कार्यकर्त्यांचे पक्षांतर सुरू झाले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष तथा मोताळा पंचायत समितीचे माजी सभापती यशवंत धाबे तसेच भारिप बहुजन महासंघाच्या महिला आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्ष मायावती दामोदर यांनी काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांच्या उपस्थितीत शेगाव येथे काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. या नेत्यांसोबतच बुथ लेव्हल व गावपातळीवरचे कार्यकर्ते दररोज विविध पक्षांमध्ये प्रवेश करीत आहेत.

Web Title: Leaders of Incoming, Outgoing