‘मनसे’च्या सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:34 IST2021-03-18T04:34:19+5:302021-03-18T04:34:19+5:30

मेहकर : मनसे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण जाधव यांच्या हस्ते पक्षाच्या सदस्य नाेंदणी अभियानास प्रारंभ करण्यात आला. यावेळी ग्रामीण भागातील ...

Launch of MNS member registration drive | ‘मनसे’च्या सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

‘मनसे’च्या सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

मेहकर : मनसे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण जाधव यांच्या हस्ते पक्षाच्या सदस्य नाेंदणी अभियानास प्रारंभ करण्यात आला. यावेळी ग्रामीण भागातील शेकडो कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण जाधव होते, तर प्रमुख उपस्थितीमध्ये मनसेचे तालुका प्रमुख संतोष अंभोरे, तालुका उपाध्यक्ष शत्रुघ्न चेके, तालुका उपाध्यक्ष गणेश पऱ्हाड, शहराध्यक्ष सुधीर रायते, राम आडे, प्रकाश मानघाले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अंकित पाटील यांनी पक्षाची ध्येयधोरणे व संघटनेबद्दल माहिती दिली. त्यानंतर सदस्य नोंदणी प्रमाणपत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामीण भागातील शेकडो युवकांनी राजसाहेब ठाकरे यांच्या विचारावर विश्वास ठेवत लक्ष्मण जाधव यांच्या नेतृत्वात मनसेमध्ये जाहीर प्रवेश केला. संचालन फिरोज शाह यांनी केले तर आभार तालुका अध्यक्ष संतोष अंभोरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी अंकित पाटील, राहुल बोडखे, आदिनाथ सुरुशे, शंकर जाधव, गणेश रास्कर, अभी काकडे, अनिकेत लाडूकर, स्वप्निल दुधाट, संतोष दुधाट, मोहन ओव्हर, मनोज खंडारे, अविनाश बचाटे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Launch of MNS member registration drive