दुर्गा विसर्जन मिरवणुकीत लाठीहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 01:38 IST2017-10-06T01:35:37+5:302017-10-06T01:38:40+5:30

दुर्गा विसर्जन मिरवणुकीत लाठीहल्ला
ठळक मुद्देगुरुवारी रात्री ८.३0 वाजताच्या सुमारास गांधी चौकात घडली घटनामंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये झाली बाचाबाची पोलिसांनी अचानक लाठीचार्ज केल्याने उडाला गोंधळ
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा: येथे दुर्गा विसर्जन मिरवणूक दरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना गुरुवारी रात्री ८.३0 वाजताच्या सुमारास गांधी चौकात घडली.
शहरातील ७ ते ८ दुर्गा उत्सव मंडळांकडून दुपारी विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. यामध्ये मिरवणूक सुरू असताना रात्री ८.३0 वाजताच्या सुमारास गांधी चौकात एका मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी पोलिसांनी अचानक लाठीचार्ज केल्याने धावपळ होऊन गोंधळ उडाला. सदर लाठीचार्जमध्ये महिला व लहान मुलेसुद्धा जखमी झाल्याची माहिती आहे.