लेट लतिफ कर्मचा-यांना दिली तंबी
By Admin | Updated: January 20, 2015 23:33 IST2015-01-20T23:33:34+5:302015-01-20T23:33:34+5:30
बुलडाणा जिल्हापरिषद सीईओंची सलामी; कार्यालयानी शिस्तीबाबत आग्रही.

लेट लतिफ कर्मचा-यांना दिली तंबी
बुलडाणा : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी पदाचा प्रभार स्विकारल्यानंतर दीपा मुधोळ यांनी खातेप्रमुखांच्या बैठकीत कार्यालयीन शिस्तीबाबत आग्रही असल्याचे निेर्देश दिले होते त्याची चुणूक जिल्हा परिषदेला आली आहे. सोमवारी झालेल्या समन्वय सभेसाठी उशीरा आलेल्या अधिकार्यांना चांगलेच धोरवर धरत मुख्य कार्यपालन अधिकारी मुधोळ यांनी त्यांचा एक दिवसाचा पगार कापून चांगलीच तंबी दिली आहे.
जिल्हा परिषदेच्या शिवाजी सभागृहात समन्वय सभेचे १९ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. या सभेत मुख्य कार्यपालन अधिकारी दीपा मुधोळ यांनी वेळेवर उपस्थित राहून सभा सुरू केली. या सभेला दोन गटविकास अधिकारी उशीरा आल्यामुळे मुधोळ यांनी चांगलेच धारेवर धरले. कार्यालयीन शिस्त व ठरलेली कामे वळेत पुर्ण करा असे निर्देश पहिल्याच दिवशी मुधोळ यांनी दिला होता मात्र तो फारसा गांभिर्याने घेतला जात नसल्याचेच उदाहरण समन्वय समितीत समोर आल्याने त्यांनी या दोन्ही गटविकास अधिकार्यांची एक दिवसाची सेवा बिनपगारी करण्याची सुचना केली. या पुढे असा प्रकार होणार नाही याची दक्षता घेण्यास सीईओ यांनी सांगीतले.
जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी राजेंद्र पाटील यांनी समन्वय सभेत उशीरा येणार्या बीडीओ यांची सेवा एक दिवसाची बिनपगारी करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे सांगीतले. कार्यलयीन शिस्तीबाबत सर्वांनाच निर्देश दिले असल्याची पुस्तीही जोडली.
*निलंबन अधिकाराचे विकेंद्रीकरण
कामामध्ये अधिक सुसत्रता यावी, तसेच कामचुकार कर्मचार्यांना शिक्षा व्हावी या उद्देशाने मुख्य कार्यपालन अधिकारी यांना निलंबनाचे अधिकार दिले आहेत या अधिकारांचे विकेंद्रीकरण करीत वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचार्यांच्या निलंबनाचे अधिकारी गटविकास अधिकार्यांना दिले आहेत. मात्र बीडीओंनी निलंबीत केलेल्या कर्मचार्यांची पदस्थापनेचे अधीकार सीईओ यांनी राखुन ठेवले आहेत.