निकाल लागण्याआधीच प्रवेशाची अंतिम तारीख

By Admin | Updated: August 6, 2015 00:34 IST2015-08-06T00:34:25+5:302015-08-06T00:34:25+5:30

पालक व विद्यार्थ्यांना आता नाहक विलंब शुल्काचा भुर्दंड पडणार.

The last date for admission before the result was reached | निकाल लागण्याआधीच प्रवेशाची अंतिम तारीख

निकाल लागण्याआधीच प्रवेशाची अंतिम तारीख

नांदुरा (बुलडाणा) : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठ अमरावतीच्या वतीने घेण्यात आलेल्या सर्वच परीक्षांचे निकाल यावेळी उशिरा लागले आहे. बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. यासारख्या द्वितीय वर्षाचे सर्वच शाखांचे निकाल अजून लागायचे असून, महाविद्यालयात प्रवेश घेण्याची ३ ऑगस्ट ही तारीखसुद्धा विद्यापीठाने घोषित केली होती. त्यामुळे नाहक पालक व विद्यार्थ्यांना आता विलंब शुल्काचा भुर्दंड पडणार आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठ अमरावती उन्हाळी परिक्षा २0१५ चा पहिला टप्पा १८ मार्च पासून सुरु झाला. यामध्ये प्रथम वर्ष व अंतिम वर्षाची परीक्षा घेण्यात आली, तर दुसरा टप्पा ६ एप्रिल पासून सुरु झाला. यामध्ये साधारण द्वितीय वर्षाची परिक्षा घेण्यात आली. पहिल्या टप्प्यातील सर्व परिक्षाचे निकाल लागले. परंतु दुसर्‍या टप्प्यातील परिक्षाचे निकाल अजुन लागावयाचे आहे. वास्तविक हे निकाल परिक्षा संपल्यापासून ४0 दिवसाच्या आत लागावयास पाहिजेत परंतु अद्यापही निकाल लागले नाही. परंतु दरवर्षी प्रमाणे प्रवेशाच्या मुदतीत वाढ करण्यात आली नाही. नेहमी प्रमाणे ३ ऑगस्ट ही प्रवेशाची अंतीम तारीख देण्यात आली आहे. वास्तविक अजुन बी.ए.,बि.कॉम,बी.एस.सी.व इतरही शाखांचे दुसर्‍या वर्षीचे निकाल लागावयाचे आहे. त्यामुळे अंतीम वर्षात अजुन एकही प्रवेश झालेला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आता कोणत्या तारखेपर्यंत प्रवेश दयायचे त्यांना विलंब शुल्क भरावे लागणार काय याबाबत विद्यापिठा कडून अजून महाविद्यालयाला कोणत्याच सूचना देण्यात आलेल्या नाही.

Web Title: The last date for admission before the result was reached

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.