लखुजी राजे स्मृतीगौरव सोहळा
By Admin | Updated: July 27, 2016 00:02 IST2016-07-27T00:02:58+5:302016-07-27T00:02:58+5:30
सिंदखेडराजा येथे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, पुरस्कार सोहळा व तलवारबाजी स्पर्धा घेण्यात आली.

लखुजी राजे स्मृतीगौरव सोहळा
सिंदखेडराजा (जि. बुलडाणा): छत्रपती लखोजीराव जाधव यांच्या स्मृतीदिनानिमित्त सिंदखेडराजा ऐतिहासिक शहरामध्ये शिवकालीन शस्त्रास्त प्रदर्शन, राजे लखुजीराव जाधव स्मृती पुरस्कार सोहळा, तसेच शहरामधून भव्य शोभायात्रा काढून स्मृतीदिन दोन दिवस मोठय़ा उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमामध्ये खासदार प्रतापराव जाधव, आ.डॉ.शशिकांत खेडेकर, ज्येष्ठ इतिहासकार डॉ.आ.ह.साळुंखे, अँड.श्रीमंत विक्रमसिंह जाधवराव यांचेसह असंख्य मान्यवर व जाधव कुळातील तसेच नागरीकांचा मोठा सहभाग होता.
राजे छत्रपती लखुजीराव जाधव यांची ऐतिहासिक साक्ष देणारा भव्य राजवाडा व त्यांच्या मृत्यूनंतर बांधण्यात आलेली त्यांची जगप्रसिद्ध समाधी (वास्तु) आजही त्यांच्या कार्याची साक्ष देते. सन २00७ पासून त्यांचा स्मृतीदिन साजरा करण्यात येतो. तर २0१५ मध्ये स्मृतीदिनानिमित्त राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्मृतीदिनानिमित्त साडेतीनशे प्रकारचे शिवकालीन शस्त्रास्त प्रदर्शनीसाठी कोल्हापूर येथून आणण्यात आले होते. त्या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार प्रतापराव जाधव यांचे हस्ते आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांचे अध्यक्षतेखाली व जिल्हा पोलिस अधिक्षक संजयकुमार बाविस्कर यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये २४ जुलै रोजी पंचायत समिती येथील जिजामाता सभागृहामध्ये करण्यात आले. तर जेष्ठ इतिहासकार आ.ह.साळुंखे, माजी आमदार तोताराम कायंदे, शिवाजी जाधव, राजेश जाधव, मा.प्राचार्य अरुण जाधव, माजी खासदार सुखदेव काळे, जगनराव ठाकरे, अँड.नाझेर काझी, अँड.श्रीमंत विक्रमसिंह जाधवराव या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये २५ जुलै रोजी राजवाड्यापासून शोभायात्रा काढण्यात आली होती. राजे लखुजीरावांची भव्य प्रतिमा असलेला रथ, राजे छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभुषेत असलेले औरंगाबाद येथील रवि बोचरे व मावळ्यांच्या वेशभुषेत असलेले त्यांचे सर्व सहकारी तसेच जिजाऊंच्या वेशभुषेत असलेली उंबरद येथील जाधव कन्या शोभायात्रेतील लक्ष वेधून घेत होते.