एक लाखाचा ऐवज लंपास

By Admin | Updated: April 24, 2015 01:31 IST2015-04-24T01:31:18+5:302015-04-24T01:31:18+5:30

मलकापूरातील घटना, गुन्हा दाखल.

Lakhas of a lakh | एक लाखाचा ऐवज लंपास

एक लाखाचा ऐवज लंपास

मलकापूर (जि. बुलडाणा): घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत घराच्या दरवाजाची कडी वाकवून घरातील नगदीसह सोन्याचे दागिणे असा एकूण एक लाख १७ हजार ७६0 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा लंपास केला. ही घटना अनुराबाद येथे २0 एप्रिल रोजी दुपारी घडली. अनुराबाद येथील लहु गोपाळा खडसे यांच्या घरातील सर्व जण शेतात गेले होते. या संधीचा फायदा घेत अज्ञात चारेट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाची कडी वाकवून घरात प्रवेश करत घरातील पत्र्याच्या पेटीमध्ये ठेवलेले ९२ हजार रुपये, सोन्याची एकदाणी अंदाजे किं.११ हजार ७६0, सोन्याची अंगठी किं.१४ हजार असा एकूण १ लाख १७ हजार ७६0 रुपयाचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Web Title: Lakhas of a lakh