शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

जनजागृतीअभावी पशुसंवर्धन विभागाच्या नाविण्यपूर्ण योजनेचा फज्जा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2018 15:59 IST

 राज्यात पशुसंवर्धन विभागाच्या नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत संकरीत गायी, म्हशींचे वाटप, मेंढी वाट, कुक्कूटपालन योजनेसाठी शेतकऱ्यांकडून आॅनलाईन अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरू आहे.

ठळक मुद्देपशुसंवर्धन विभागाच्या नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत संकरीत गायी, म्हशींचे वाटप, मेंढी वाट, कुक्कूटपालन योजनेसाठी शेतकऱ्यांकडून आॅनलाईन अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरू योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालक शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची माहिती न देता दिशाभूल केली जात असल्याचा प्रकार येथील पंचायत समितीत आढळून आला. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.

खामगाव - राज्यात पशुसंवर्धन विभागाच्या नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत संकरीत गायी, म्हशींचे वाटप, मेंढी वाट, कुक्कूटपालन योजनेसाठी शेतकऱ्यांकडून आॅनलाईन अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरू आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालक शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची माहिती न देता दिशाभूल केली जात असल्याचा प्रकार येथील पंचायत समितीत गुरुवारी सकाळी आढळून आला. 

शेतकऱ्यां चे आर्थिक उत्पन्न वाढण्यासाठी सरकारने शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय करण्यासाठी तसेच कुक्कूटपालन करण्यासाठी प्रोत्साहीत केले जात आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे. मात्र तालुक्यातील शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्याचे दिसून येते. पंचायत समितीतील पशुसंवर्धन विभागाने त्याबाबतची जनजागृती केली नसल्याने शेतकऱ्यांना योजनेची माहिती मिळू शकत नसल्याचे दिसते. लांजूड येथील काही शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी पंचायत समितीतील पशुसंवर्धन विभागात आले होते. याठिकाणी असलेल्या पशुधन पर्यवेक्षक बी.एन.बोपटे यांनी शेतकऱ्यांना कुठलीही माहिती न देता थेट राठी झेरॉक्सचा रस्ता दाखवला. त्यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली. शेतकऱ्यांनी अखेर गटविकास अधिकारी के.डी.शिंदे यांची भेट घेवून बोपटे यांची तक्रार केली. त्यानंतर शिंदे यांनी बोपटे यांना बोलावून शेतकऱ्यांना माहिती देण्याबाबत आदेश दिले. विशेष म्हणजे पंचायत समितीतील पशुसंवर्धन विभागात योजनेसाठी पात्र शेतकरी, पशुपालक किती याची कोणताही माहिती उपलब्ध आढळून आली नाही. 

तालुका पशुसंवर्धन अधिकारी अनुपस्थित!

पशुधन पर्यवेक्षक बी.एन.बोपटे यांच्याकडून समाधान न झाल्याने त्यांनी तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आर.डी.अवताळे यांची भेट घेण्याचे ठरवले. मात्र तेही जागेवर अनुपस्थित आढळून आले. त्यांचा मोबाईलही बंद होता. 

पंचायत समितीतील पशुसंवर्धन विभागाच्या योजनेबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली आहे. आॅनलाईन प्रक्रिया असल्याने सर्वच शेतकऱ्यांना माहितीच आहे. लांजूड येथील शेतकरी भेटायला आल्यानंतर पशुधन पर्यवेक्षक बी.एन.बोपटे यांना बोलावून माहिती देण्यात आली. 

 के.डी.शिंदे, गटविकास अधिकारी, खामगाव

 

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरी