उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सुविधांचा अभाव
By Admin | Updated: October 27, 2014 22:48 IST2014-10-27T22:48:23+5:302014-10-27T22:48:23+5:30
तज्ज्ञ डॉक्टरांची वाणवा : रेफर टू अकोला पध्दत सुरुच.

उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सुविधांचा अभाव
फहीम देशमुख/ शेगाव
जागतिक बँक व तिर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अर्थसाहाय्याने मोठा खर्च करून शेगाव येथे उपजिल्हा रुग्णालयाची इमारत बांधण्यात आली. परंतु तज्ञ डॉक्टारांच्या अभावामुळे येथे उपलब्ध आधुनिक यंत्रसामग्रीचा रुग्णांसाठी वापर करता येत नाही. त्यामुळे तालुक्यातील जनतेला आरोग्यसेवेसाठी खासगी रुग्णालयात किंवा खामगाव, अकोला जाऊन आर्थिक भुदर्ंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथील उपजिल्हा रुग्णालयाचेच आरोग्य बिघडलेले दिसते. शेगाव येथे उपजिल्हा रुग्णालयाची सुसज्ज इमारत आहे. शेगाव, संग्रामपूर, जळगाव व बाळापुर तालुक्यातील काही भागातील नागरीक या रुग्णालयावर अवलंबुन असुन दररोज किमान १00 रुग्ण दाखल होवून उपचार घेतात तर बाह्य रुग्ण विभागात १५0 च्या जवळ पास रुग्ण औषधोपचार घेतात. या भागात होणार्या अपघातातील जखमींवर याठिकाणी उ पचार करण्यात येतात. मात्र आता हे रुग्णालय फक्त नाममात्र राहिले असून तज्ज्ञ डॉक्टरांची वाणवा येथे जाणवत आहे. त्यामुळे गंभीर जखमींवर प्रथमोपचार करून त्यांना पुढील उ पचारासाठी अकोला किंवा नागपूर येथील रुग्णालयात हलविले जाते. तसेच प्रसूतीसाठी दाखल होणार्या मातांची प्रसूती करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे कंत्राटी डॉ क्टरांची सेवा दिली जाते. नॉर्मल होणार्या डिलेव्हरी पेशंटलाच या रुग्णालयात थांबविले जाते. रुग्णांची प्रकृती गंभीर झाल्यास त्याला अकोला हलविण्याचा सल्ला दिला जातो. मात्र हे ५0 किमी अंतर कापतांना रुग्णाचे मोठय़ा प्रमाणावर हाल होतात. तसेच जोखीम सुध्दा प त्करावी लागते.