आरोग्य सुविधांचा अभाव
By Admin | Updated: August 31, 2014 23:53 IST2014-08-31T23:22:08+5:302014-08-31T23:53:21+5:30
लोकमत स्टीग ऑपरेशन; मेहकर ग्रामीण रुग्णालयाकडे बुलडाणा जिल्हाआरोग्य प्रशासनाचे दुर्लक्ष.

आरोग्य सुविधांचा अभाव
ब्रम्हानंद जाधव / मेहकर
बदलत्या वातावरणाने तालुकाभर डेंग्युसह साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. अशातच खाजगी रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयेही हाऊसफुल्ल झाली आहेत. परंतू, मेहकर ग्रामीण रुग्णालयाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने येथील रुग्ण वार्यावर असल्याचे धक्कादायक वास्तव लोकमतने ३१ ऑगस्ट रोजी केलेल्या ह्यस्टिंग ऑपरेशनह्णने समोर आले असून, ग्रामीण रुग्णालयाचा कारभारही चव्हाट्यावर आणला.
मेहकर व लोणार तालुक्यात डेंग्यु आणि मलेरियाने थैमान घातले असून शहरातील रुग्णालये हाऊस फुल्ल झाली आहेत. डेंग्यु सदृश्य तापेमुळे मेहकर व लोणार तालुक्यातील दोन जण दगावल्याची घटना गत आठवड्यात घडली होती. तसेच मेहकर शहरासह तालुक्यात व लोणार तालुक्यातील पिंपळनेर, किन्ही, कोयाळी, सरस्वती, याठिकाणीही डेंग्यू सदृश्य तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्याचबरोबर विविध कारणांमुळे साथीच्या आजारानेही डोकेवर काढले आहे.
सद्यस्थितीत शासकीय तसेच खासगी रुग्यालयात दाखल असलेल्या रुग्णांमध्ये डायरिया व टायफाईडचे रुग्ण सर्वाधिक असल्याचे आढळुन आले आहे. परंतू, या साथिच्या आजारावर नियंत्रण घालण्यास आरोग्य यंत्रणाही कुचकामी ठरत आहे. गोरगरिंब रुग्णांना जिवनदायी म्हणुन ग्रामीण रुग्णालयाकडे पाहिले जाते. आजही सर्वाधिक रुग्णांची मदार ग्रामीण रुग्णालयावर आहे. ग्रामीण रुग्णालयात सध्या १९ कर्मचारी कार्यरत असून, चार जागा रिक्त आहेत. मात्र, ड्युटीवर असलेल्यापैकी रुग्णालयात केवळ एकच परिचर हजर दिसून आला ; तर २५ रुग्ण उपचारार्थ भर्ती होते. वैद्यकीय अधिकार्यांसह कर्मचार्यांच्या रिकाम्या खुच्र्या यावेळी लोकमत प्रतिनिधीना दिसून आल्या. तसेच रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधला असता, त्यांनी आपल्या विविध समस्या मांडल्या. ग्रामीण रुग्णालयात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, रुग्णालय परिसरात गाजर गवतही मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. ग्रामीण रुग्णालयातील अपुर्या सुविधांमुळे व डॉक्टरांच्या दुर्लक्षीमुळे रुग्ण खाजगी रुग्णालयात धाव घेत असल्याचेही वास्तव लोकमतच्या स्टिंग ऑपरेशन मधुन समोर आले आहे.
*रुग्णांचे हाल
लोकमत चमू ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १२.१५ वाजता मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात भेट दिली. यावेळी संपुर्ण रुग्णालयाची पाहणी केली असता वैद्यकीय अधिकार्यांच्या रिकाम्या खुर्चीला फॅन हवा मारत असल्याचे दिसून आले. तर वैद्यअधिकारी व कर्मचार्यांच्या गैरहजेरीमुळे रुग्णालयातील रुग्णांची गैरसोय झाली होती.
*रिक्तपदांचा बोझा
भेटी दरम्यान रुग्णालयातही एकही डॉक्टर आढळून आला नाही. त्यानंतर प्रत्येक वार्डात जाऊन पाहिले असता, एकच परिचर संपुर्ण रुग्णांची देखभाल करीत होता. यासंदर्भात माहिती घेतली असता आज रविवार असल्यामुळे शक्यतोवर डॉक्टर हजर राहत नाहीत अशी माहिती मिळाली. या ग्रामीण रुग्णालयात १९ कर्मचारी कार्यरत आहे. इतर चार पदे रिक्त आहेत. त्यामध्ये डॉक्टर, परिचारिका, रुग्णवाहिका चालक व लॅब टेक्नीशन यांचा समावेश आहे.