शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांच्या पाल्यांना हंगामी वसतिगृहाचा आधार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:41 IST

लोणार : गावात हाताला काम नसल्याने पुणे, औरंगाबाद, मुंबईसारख्या महानगराच्या ठिकाणी मजुरी करण्यासाठी तालुक्यातील गोत्रा, टिटवी, खुरमपूर गावातील हजारो मजूर गेले आहेत. त्यांच्या मुलांचे शिक्षण थांबू नये, मुलांचे स्थलांतर रोखून त्यांच्या जेवणाची सोय व्हावी, यासाठी गटशिक्षणाधिकारी एस.आर.चव्हाण यांनी  १ मार्चपासून गोत्रा, टिटवी व खुरमपूर येथे हंगामी वसतिगृह सुरु केले आहे. मजुरांच्या पाल्यांना या हंगामी वसतिगृहाचा आधार मिळत आहे. 

ठळक मुद्देलोणार तालुक्यात हंगामी वसतिगृह सुरू हजारो मजुरांचे कामासाठी स्थलांतरण 

किशोर मापारी । लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : गावात हाताला काम नसल्याने पुणे, औरंगाबाद, मुंबईसारख्या महानगराच्या ठिकाणी मजुरी करण्यासाठी तालुक्यातील गोत्रा, टिटवी, खुरमपूर गावातील हजारो मजूर गेले आहेत. त्यांच्या मुलांचे शिक्षण थांबू नये, मुलांचे स्थलांतर रोखून त्यांच्या जेवणाची सोय व्हावी, यासाठी गटशिक्षणाधिकारी एस.आर.चव्हाण यांनी  १ मार्चपासून गोत्रा, टिटवी व खुरमपूर येथे हंगामी वसतिगृह सुरु केले आहे. मजुरांच्या पाल्यांना या हंगामी वसतिगृहाचा आधार मिळत आहे. लोणार तालुक्यात गेल्या चार वर्षांपासून पर्जन्यमान कमी झालेले आहे, तसेच तालुक्याला दरवर्षी नैसर्गिक आपत्तीचा फटका बसत असल्यामुळे आणि शासन स्तरावर गावात रोजगार उपलब्ध होत नसल्यामुळे पुणे, औरंगाबाद, मुंबई या ठिकाणी हजारो मजूर जातात. माय-बाप घर संसाराचा गाडा हाकण्यासाठी बाहेर गावी असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा प्रकार गटशिक्षणाधिकारी एस.आर. चव्हाण यांच्या निदर्शनास आला.  गावात कोणी सांभाळ करण्यास  नसल्यामुळे अनेक विद्यार्थी बाहेरगावी जात असल्यामुळे त्यांचे भवितव्य धोक्यात येऊ नये, यासाठी गटशिक्षणाधिकाºयांनी  केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा समिती यांच्या बैठका घेऊन विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी तालुक्यातील टिटवी, गोत्रा, खुरमपूर याठिकाणी हंगामी वसतिगृह सुरु करण्याचा निर्णय घेतला. याबाबत गोदावरी कोकाटे यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला असून, गटशिक्षणाधिकाºयांच्या प्रयत्नांमुळे १ मार्चपासून दोन वेळेच्या जेवणाची सोय झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहºयावर आनंद दिसून आला. हंगामी वसतिगृहाच्या उद्घाटनप्रसंगी सरपंच भगवान कोकाटे, गटशिक्षणाधिकारी एस.आर.चव्हाण, केंद्रप्रमुख जंगलसिंग राठोड, शाळा समिती अध्यक्ष, सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक व गावकरी उपस्थित होते. हंगामी वसतिगृह सुरू करण्याच्या या उपक्रमामुळे मजुरांच्या पाल्यांना मोठा आधार झाला असून, यामुळे त्यांच्या शिक्षणातही सातत्य राहणार आहे.  

टॅग्स :LonarलोणारStudentविद्यार्थी