विजेच्या धक्क्याने मजूर युवकाचा मृत्यू

By Admin | Updated: January 22, 2015 00:34 IST2015-01-22T00:34:11+5:302015-01-22T00:34:11+5:30

शेगाव येथील घटना; आक स्मिक मृत्यूची नोंद.

Labor victim's death by electric shock | विजेच्या धक्क्याने मजूर युवकाचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने मजूर युवकाचा मृत्यू

शेगाव (जि. बुलडाणा) : येथील सरकारी फैलमध्ये राहणारा जितेंद्र भागवत या १६ वर्षीय मजूर युवकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना २0 जानेवारी रोजी सायंकाळी ५.३0 वाजेच्या सुमारास घडली.
खामगाव येथील भागवत कुटुंब शेगाव येथे दोन वर्षांंपासून वास्तव्यास आहे. याच कुटुंबातील जितेंद्र संजय भागवत हा शेगाव येथील अग्रसेन चौकातील पूजा बिछायत केंद्रात मजूर म्हणून कामावर होता. सायंकाळी गौलखेड रोडवर बिछायतचे काम सुरू असताना विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Labor victim's death by electric shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.