शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांच्या निवासस्थानात कोतवालाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 11:41 IST

Kotwal commits suicide at tehsildar's residence : मृताच्या खिशामध्ये पोलिसांना एक चिठ्ठीही सापडली असून त्यात तीन जणांची नावे असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : येथील तहसीलदारांच्या शासकीय निवासस्थानामध्ये एका कोतवालाने आत्महत्या केल्याची घटना २७ जून रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, मृताच्या खिशामध्ये पोलिसांना एक चिठ्ठीही सापडली असून त्यात तीन जणांची नावे असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. मात्र तपासाच्या दृष्टीने काही बाबी पोलिसांनी उघड केल्या नाहीत.मोताळा तहसीलदारांच्या शासकीय निवासस्थानामध्ये कोणी हजर नसताना  या निवासस्थानासोबतच कार्यालयाची देखभाल करणाऱ्या कोतवालाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तहसीलदार रविवार असल्याने बाहेरगावी गेले होते. त्यामुळे निवासस्थानी कोणीही नव्हते. विष्णू शंकर सुरपाटणे (४४) असे मृत कोतवालाचे नाव आहे. त्याने नेमक्या कोणत्या कारणावरून आत्महत्या केली ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र पोलीस त्याचा शोध घेत आहेत. विष्णू सुरपाटणे यांचा फोन लागत नसल्याने त्यांच्या मुलांनी तहसील कार्यालयासह परिसरात त्यांचा शोध घेतला असता तहसीलदारांच्या शासकीय निवासस्थानी पंख्याला गळफास घेऊन विष्णू सुरपाटणे यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले.  घटनेची माहिती मिळताच बोराखेडीचे ठाणेदार माधवराव गरुड व त्यांचे सहकारी तसेच महसूल विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.  घटनेचा पुढील तपास साहाय्यक ठाणेदार राहुल जंजाळ करीत आहेत.  मृत व्यक्तीच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये तीन व्यक्तींची नावे असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. घटनास्थळाचा पंचनामा करून बोराखेडी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :MotalaमोताळाCrime Newsगुन्हेगारी