कोथळीत दोघांवर रानडुकराचा हल्ला

By Admin | Updated: June 6, 2017 00:04 IST2017-06-06T00:04:28+5:302017-06-06T00:04:28+5:30

मोताळा : रानडुकराच्या हल्ल्यात दोन जण जखमी झाल्याची घटना ४ जून रोजी कोथळी शिवारात घडली. शेतामध्ये काम करत असताना आत्माराम गावंडे यांच्यावर रानडुकराने हल्ला केला.

Kothali ransukharara attack for both | कोथळीत दोघांवर रानडुकराचा हल्ला

कोथळीत दोघांवर रानडुकराचा हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
मोताळा : रानडुकराच्या हल्ल्यात दोन जण जखमी झाल्याची घटना ४ जून रोजी कोथळी शिवारात घडली. शेतामध्ये काम करत असताना आत्माराम नामदेव गावंडे (वय ४० रा. कोथळी) यांच्यावर अचानक रानडुकराने हल्ला केला. गावंडे यांना चावा घेऊन जखमी केले. रानडुक्कर नदीकडे पळाले, तर तेथेच नदीमध्ये खेळत असलेला मुलगा गोपाल प्रकाश राऊत वय १० रा. कोथळी याच्यावरदेखील रानडुकराने हल्ला करीत जखमी केले. दोघाही जखमींना प्रथम मोताळा येथील ग्रामीण रुग्णालयात नेऊन प्रथमोपचार करण्यात आले असून, पुढील उपचारासाठी बुलडाणा येथे हलविण्यात आले.

Web Title: Kothali ransukharara attack for both