शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा:  खामगावात नगरपालिका कार्यालयासह वाहनांची तोडफोड, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 02:33 IST

खामगाव : कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ खामगाव शहरासह तालुक्यात कळकळीत बंद पाळण्यात आला. दरम्यान कार्यकर्त्यांनी नगरपालिकेच्या कार्यालयासह शहरातील बंद दुकानांची तोडफोड केली. शहरात सर्वत्र तणावाचे वाातावरण असून पोलिसांकडून काही भागात सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. 

ठळक मुद्दे शहरात सर्वत्र तणावाचे वाातावरण असून पोलिसांकडून काही भागात सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. दरम्यान काही धावत्या वाहनांवर दगडफेक झाल्याने नागरिक भयभित झाले होते.आंदोलनदरम्यान दुखापत झालेल्या दोन कार्यकर्त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. 

खामगाव : कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ खामगाव शहरासह तालुक्यात कळकळीत बंद पाळण्यात आला. दरम्यान कार्यकर्त्यांनी नगरपालिकेच्या कार्यालयासह शहरातील बंद दुकानांची तोडफोड केली. शहरात सर्वत्र तणावाचे वाातावरण असून पोलिसांकडून काही भागात सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. 

खामगाव शहरात चार दुकानासह, पाच ते सहा वाहने फोडण्यात आली. रस्त्याने जाणाऱ्या दुचाकी स्वारांना थांबवून काही वाहनांची तोडफोडीच्या घटना उघडकीस आल्या. दरम्यान शहरातील विविध मार्गावरुन समाजबांधवासह विविध पक्षाच्या पदाधिकाºयांनी शांततेचे आवाहन केले. उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देवून भीमा कोरेगाव येथील जाळपोळ प्रकरणाचा तपास करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. बसस्थानकावर शांतता होती. दरम्यान काही धावत्या वाहनांवर दगडफेक झाल्याने नागरिक भयभित झाले होते. मात्र वेळीच पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. आंदोलनदरम्यान दुखापत झालेल्या दोन कार्यकर्त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. 

वैद्यकीय अधिक्षक गैरहजर जिल्हा सामान्य रुग्णालयात बाह्य रुग्ण विभाग सुरु होता. मात्र वैद्यकीय अधिक्षक डॉ. शंकरराव वानखडे यांची अनुपस्थिती आढळून आली. संवेदनशील परिस्थिती सुद्धा वैद्यकीय अधिक्षक गैरहजर असल्याने कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. शहरातील खासगी दवाखाने व मेडीकल सुद्धा बंद दिसून आली. त्यामुळे रुग्णांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली. 

महामार्गावर रास्तारोको नांदुरा, मलकापूर येथून जाणाºया राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको करण्यात आला. यामुळे वाहनांची दहा किलोमिटर पर्यंत वाहनांची रांग लागली होती. पोलिसांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. 

 

बच्चेकंपनींनी घेतला सुटीचा आनंद शहरातील शाळा, महाविद्यालयांना सुटी होती. त्यामुळे चिमुकले अंगणात, घरासमोरील खुल्या मैदानात खेळतांना दिसून आली. 

संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षाचे कार फोडली संभागी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष रवी महाले यांची कार खामगावातील उपविभागीय अधिकारी कार्यालयाजवळ फोडली. मात्र रवी महाले यांनी शांततेने प्रकरण हाताळले.

टॅग्स :khamgaonखामगावBhima-koregaonभीमा-कोरेगावNagar Bhavanनगरभवन