कोल्हटकर मार्ग नामफलकाचे अनावरण
By Admin | Updated: May 4, 2015 01:14 IST2015-05-04T01:14:44+5:302015-05-04T01:14:44+5:30
नगरपालिकेचा पुढाकार; दुर्गा चौकात लागला फलक.

कोल्हटकर मार्ग नामफलकाचे अनावरण
जळगाव जामोद : २८ वर्षापूर्वी नामशेष झालेल्या श्री. कृ.कोल्हटकर मार्ग नामफलकाचे महाराष्ट्र दिनी नगराध्यक्ष रामदास बोंबटकार व उपाध्यक्ष तुकाराम काळपांडे यांच्या हस्ते अखेर अनावरण करण्यात आले. 'लोकमत'ने या संदर्भात गुरुवारी वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत नगरपालिकेने हा नामफलक पुन्हा स्थापित केला. कोल्हटकर १५ वर्षे जळगावात वास्तव्याला होते. सध्याचे किसनलालजी केला यांचे घर त्यांचेच होते. नगरपालिकेने या घराच्या रस्त्यालाच ह्यश्रीपाद कृष्ण कोल्हटकर मार्गह्ण असे नाव दिले होते. या नावाचा फलक दुर्गा चौकात होता; मात्र तो १९८७ पासून नामशेष झाला होता. ह्यलोकमतह्णच्या वृत्तानंतर नगरपालिकेने त्याची पुनस्र्थापना केली आहे. यावेळी नगराध्यक्ष बोंबटकार, उपाध्यक्ष तुकाराम काळपांडे, पंडितराव भाटे, सखाराम ताडे, अनिता मिश्रा, मुख्याधिकारी डॉ.नितीन शेळके, कैलास डोबे, संतोष कच्छवा, शे. जावेद, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष प्रा. राजेश गोटे, शिवसेना शहरप्रमुख विजय ढगे, संजय भुजबळ, सुधाकर जोशी, नीलेश शर्मा उपस्थित होते.