दुचाकी चालकावर चाकू हल्ला
By Admin | Updated: August 25, 2014 02:24 IST2014-08-25T01:57:32+5:302014-08-25T02:24:52+5:30
मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख फाट्यानजीक एका दुचाकी चालकवर चाकू हल्ला.

दुचाकी चालकावर चाकू हल्ला
डोणगाव : मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख फाट्यानजीक एका दुचाकी चालकास अडवून त्याच्यावर चार जणांनी चाकू हल्ला केला. त्यानंतर दुचाकी चालकाकडे असलेले ५ हजार रुपये लंपास केल्याची घटना २३ ऑगस्टच्या रात्री ९.३0 वाजता घडली.
शेलगाव देशमुख येथील भारत सुभाष म्हस्के (१९) हा त्याच्या मोटारसायकलने शेलगावकडे जात होता. दरम्यान, डोणगाव येथील सलीम शाह अब्दुल शाह याने भारत म्हस्केची मोटारसायकल शेलगाव देशमुख फाट्यानजीक अडविली. त्यानंतर शाहरुख शाह हनिफ शाह, सोम सखाराम खेत्रे, मकबुल शाह महेमुद शाह हे मोटारसायकलने घटनास्थळावर आले. या सर्वांंनी मिळून भारत म्हस्के याच्यावर चाकूने वार करून त्याला जखमी केले व त्याच्या खिशातील ५ हजार रुपये काढून घटनास्थळावरून पोबारा केला.
गंभीर जखमी अवस्थेत भारत म्हस्के याने तत्काळ डोणगाव पोलिस स्टेशन गाठले. त्या ठिकाणी उपस्थित ठाणेदार ज्ञानेश्वर घुगे यांना सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोधाशोध घेऊन चारही आरोपींना अटक केली व फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध कलम ३९४, ३४ आयपीसी नुसार गुन्हा दाखल केला आहे. जिल्ह्यात वाटमारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, दोन दिवसांपूर्वी हिवरा आश्रमनजीक असलेल्या ग्राम बार्हई येथे अशी वाटमारी करून लुटण्याचा प्रकार घडला होता.