ट्रॅक्टर पुलावरुन कोसळून एक ठार
By Admin | Updated: July 31, 2014 01:29 IST2014-07-31T00:58:56+5:302014-07-31T01:29:32+5:30
ढालसावंगी जवळ घडला अपघात, दोन जखमी.

ट्रॅक्टर पुलावरुन कोसळून एक ठार
धाड : ग्राम ढालसावंगी नजीक असणार्या पुलावर आज दुपारी साधारण १२ वाजता सुमारास एसटी बसचा आणि ट्रॅक्टरचा अपघात झाला. या अपघाता ट्रॅक्टर पुलावरुन थेट नाल्यात कोसळल्याने या घटनेत १ ठार तर २ जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली. अजाबसिंग नारायण सोळंकी असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, धाड-बुलडाणा रोडवर ग्राम ढालसावंगी जवळ असणार्या नाल्यावर आज दुपारी १२ वाजता सुमारास एस.टी. आणि ट्रॅक्टरचा अपघात घडला. यातील ट्रॅक्टर क्र. एम.एच. २८ टी ८७८९ हा बुलडाणा कडून धाडला येत होता. त्याचे पाठीमागे असणारी पैठण -बुलडाणा ही बस (बस क्र. एम.एच.१४ बीटी २२४0) बुलडाण्यावरुन पैठणकडे जात होती. या बसने ट्रॅक्टरला ओव्हरटेक केले त्यावेळी ट्रॅक्टरच्या मागे असलेले पेरणीयंत्र बसच्या टायरमध्ये गुंतल्याने हा ट्रॅक्टर पुलावरुन थेट नाल्यात कोसळला. ह्या ट्रॅक्टरवर रमाकांत उत्तम वारे, अजाबसिंग नारायण सोळंके व भानूदास उत्तम नरोटे हे तीघे होते. सदर घटनेत हे तिघेही गंभीररित्या जखमी झाले.
घटनेची माहिती होताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊ उलटा झालेला ट्रॅक्टर सरळ करुन त्याखालून तीघांना बाहेर काढले व तात्काळ वाहनातून पुढील उपचारार्थ बुलडाण्यास रवाना केले. मात्र तोवर ह्या ठिकाणी असणार्या बसचे चालक व वाहक तेथून पसार झाले होते. उपचारा दरम्यान अजबासिंग सोळंके यांचा मृत्यू झाला असुन दोघांना उपचारार्थ बुलडाणा येथून औरंगाबाद कडे हलविण्यात आले आहे. दरम्यान भाऊराव वारे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार धाड पोलिसांनी पैठण आगाराचे एस.टी.चालक रमेश भाऊराव पवार यांचे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.