अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम ठार
By Admin | Updated: June 6, 2017 00:01 IST2017-06-06T00:01:56+5:302017-06-06T00:01:56+5:30
म्हसला गावाजवळची घटना

अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम ठार
धाड : ग्राम रुईखेड मायंबा या गावावरून घरी परत असताना ग्राम म्हसला गावाजवळच्या वळणावर मोटार सायकलस्वारास औरंगाबादकडून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात एक जण ठार झाला. अज्ञात वाहनचालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहेबराव मोतीराम शिंदे (वय ५० वर्षे) हे रुईखेड मायंबा गावावरून दुचाकी क्रमांक एम.एच.२८ एस ९२३ ने आपल्या गावास रात्रीच्या दरम्यान परत येत असताना ग्राम म्हसला बु. जवळच्या पुलावर औरंगाबादकडून येणाऱ्या एका अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक दिल्यामुळे या ठिकाणी साहेबराव शिंदे हे गंभीर जखमी होऊन पडले. या घटनेची माहिती या रस्त्यावरून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांनी पोलिसांना दिली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेऊन साहेबराव शिंदेंना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केला असून, वाहनाचा शोध घेण्यात येत आहे.