भुईशिंगातील बालकाचे अपहरण
By Admin | Updated: May 28, 2017 04:19 IST2017-05-28T04:19:35+5:302017-05-28T04:19:35+5:30
१३ वर्षीय यश ईश्वर इंगळे या बालकाला २५ मे च्या दुपारी अज्ञात इसमाने पळवून नेल्याची तक्रार

भुईशिंगातील बालकाचे अपहरण
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा : तालुक्यातील भुईशिंगा येथील १३ वर्षीय यश ईश्वर इंगळे या बालकाला २५ मे च्या दुपारी अज्ञात इसमाने पळवून नेल्याची तक्रार त्याच्या आईने २६ मे च्या रात्री नांदुरा पोलीस स्टेशनला दिली आहे.
अपहरण झालेल्या बालकाची आई उज्ज्वला ईश्वर इंगळे (वय ३0) रा. भुईशिंगा यांनी नांदुरा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत नमूद केले, की त्यांचा मुलगा यश ईश्वर इंगळे (वय १३) हा २५ मे च्या दुपारी १२ ते ४ वाजेदरम्यान गावातील नागरिक सुनील भिडे यांच्या घराजवळ खेळत असताना अज्ञात इसमाने पळवून नेले.
याबाबतची फिर्याद त्यांनी २६ मे च्या रात्री नांदुरा पोलीस स्टेशनला दिली आहे. नांदुरा पोलिसांनी याबाबत गुन्ह्याची नोंद करून वेगाने बालकाच्या शोधासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.