खल्याळ गव्हाण येथे दहा वर्षानंतर बससेवा सुरु

By Admin | Updated: December 22, 2014 23:37 IST2014-12-22T23:37:34+5:302014-12-22T23:37:34+5:30

पुनर्वसनामुळे बंद होती बससेवा.

Khayal Gawan started the bus service after ten years | खल्याळ गव्हाण येथे दहा वर्षानंतर बससेवा सुरु

खल्याळ गव्हाण येथे दहा वर्षानंतर बससेवा सुरु

देऊळगावराजा (बुलडाणा) : तालुक्यातील खल्याळ गव्हाण येथील बससेवा तब्बल दहा वर्षापासून बंद होती. त्यामुळे गावात पुन्हा बससेवा सुरु करण्यात यावी या मागणीसाठी गावकर्‍यांकडुन प्रयत्न करण्यात येते होते. बहुप्रतिक्षेनंतर शनिवारी २0 डिसेंबर रोजी सकाळी १0 वाजता बसखल्याळ गव्हाणला बस पोहचली.
तालुक्यातील खल्याळ गव्हाणचे पुनर्वसन करण्यात आल्यामुळे तबब्ल दहा वर्षापासून खल्याळ गव्हाणसह सिंनगाव पांगरी, डोईफोडेवाडी या गांवची बससेवा खंडीत झाली होती. या गावांसाठी आवश्यक सोई सुविधा शासनातर्फे तात्काळ न मिळाल्यामुळे व गावात जाण्यासाठी योग्यरस्ता नसल्यामुळे बससेवा सुरु करण्यास अडचणी निर्माण होत होत्या. मात्र बांधकाम विभागाचे उपअभियंता के.डी. वाळके, जेई एस.एम. बागडे, व तहसीलदार शंकरराव बुटले यांच्यासह कंत्राटदार राजेंद्र काटे यांनी रस्त्याचे काम पुर्ण करुन गावकर्‍यांना बससेवा सुरु करण्याचा मार्ग सुकर केला.

Web Title: Khayal Gawan started the bus service after ten years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.