खामगावातील आठ रस्ते टाकणार कात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 01:09 IST2017-08-12T01:08:54+5:302017-08-12T01:09:52+5:30
खामगाव: शहरातील मुख्य आठ रस्त्यांची दशा पालटणार असल्याचे शुभसंकेत पालिका प्रशासनाकडून मिळत आहेत. या रस्त्यांच्या निर्मितीची निविदा प्रक्रिया पूर्णत्वास आली असून, येत्या काही दिवसांमध्ये या रस्त्यांच्या बांधकामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे दिसून येते.

खामगावातील आठ रस्ते टाकणार कात!
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: शहरातील मुख्य आठ रस्त्यांची दशा पालटणार असल्याचे शुभसंकेत पालिका प्रशासनाकडून मिळत आहेत. या रस्त्यांच्या निर्मितीची निविदा प्रक्रिया पूर्णत्वास आली असून, येत्या काही दिवसांमध्ये या रस्त्यांच्या बांधकामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे दिसून येते.
गेल्या काही दिवसांमध्ये शहरातील अंतर्गत रस्ते आणि मुख्य रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था पाहता, पालिका प्रशासनाकडून या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न केले जात आहेत. खामगाव पालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी सुचविलेल्या विविध रस्त्यांसोबतच शहराचा संपूर्ण विकास लक्षात घेता, रस्ता निधींतर्गत शहरातील प्रमुख आठ रस्त्यांचे डांबरीकरण, रुंदीकरण आणि दुरुस्तीकामी प्रस्ताव तयार करण्यात आला. शहरातील नागरिकांना सोयी- सुविधा देण्यासाठी सर्वसमावेशक अशा प्रमुख आठ रस्त्यांची दुरुस्ती आणि डांबरीकरण आता करण्यात येणार आहे.
ंया रस्त्यांचे पालटणार रूप!
- शहरातील भुसावळ चौक ते गौतम चौकपर्यंतच्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार असून, यासाठी १ लक्ष ७३ हजार रुपयांचा निधी खर्ची घालण्यात येईल.
- तलाव रोड ते गुरुद्वारापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरणासाठी साडेसात लक्ष रुपये तर रायगड कॉलनीतील नांदुरा रोडवरील शुक्ला यांच्या घरापासून ते घाटपुरी रोड रस्ता रुंदीकरण, डांबरीकरण आणि नाली बांधकामासाठी साडेनऊ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले. तर खेल का मैदान ते रेल्वे गेटपर्यंतचा रस्ता दुरुस्तीसाठी साडेतीन लक्ष रुपयांचा निधी, राणा गेट ते नगरपालिका हद्दीपर्यंत फक्कड देवी मंदिर रस्त्यासाठी दोन लक्ष रुपये मंजूर करण्यात आले.
- तर हेंड पाटील यांच्या घराकडे जाणार्या रस्त्यासाठी अडीच लक्ष रुपये, जोशी नगरातील सुराणा ते मलिरामा सेंटरजवळील आरस रस्त्याच्या डांबरीकरणासाठी एक लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
ग्रामीण पोलीस स्टेशन रस्त्याचेही भाग्य उजळणार!
बसस्थानकासमोरील आणि शहरातील अतिशय वर्दळीचा रस्ता म्हणून ओळख असलेल्या ग्रामीण पोलीस स्टेशन रस्त्याचेही भाग्य आता उजळणार आहे. या रस्त्यांवरील डबक्यांपासून नागरिकांची आता कायमची सुटका होणार असल्याचे संकेत आहेत.
रस्ते दुरुस्तीत भेदभाव नाही!
शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करताना, सत्ताधारी नगरसेवकांप्रमाणेच विरोधी नगरसेवकांच्या परिसरातील रस्त्यांचाही समान विचार करण्यात आला. कोणताही भेदभाव न करता, रस्ता दुरुस्तीला प्राधान्य देण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासूनचा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यात येत आहे. खामगाव मतदारसंघाचे आ. आकाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनात शहरातील आठ रस्त्यांच्या दुरुस्ती आणि डांबरीकणास लवकरच गती दिली जाणार असून, या रस्त्यांची निविदा प्रक्रिया जवळपास पूर्णत्वास आली आहे. शहराच्या सर्वसमावेश विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
- अनिता डवरे, नगराध्यक्ष, खामगाव.