शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खामगावच्या उपजिल्हा रुग्णालयातून बाळास पळविले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 01:32 IST

खामगाव : येथील उप-जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसाच्या  बाळास एका बुरखाधारी महिलेने पळवून नेल्याची  खळबळजनक घटना बुधवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास  घडली. सदर महिला एका कारमधून आली व तिने वॉर्डातून  बाळ उचलून पलायन केल्याची ही घटना सीसी कॅमेर्‍यात कैद  झाली आहे.

ठळक मुद्देपोलिसांना आव्हान संशयित महिला सीसी कॅमेर्‍यात कैद  

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : येथील उप-जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसाच्या  बाळास एका बुरखाधारी महिलेने पळवून नेल्याची  खळबळजनक घटना बुधवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास  घडली. सदर महिला एका कारमधून आली व तिने वॉर्डातून  बाळ उचलून पलायन केल्याची ही घटना सीसी कॅमेर्‍यात कैद  झाली आहे. वडनेर भोलजी येथील  सुमय्या परवीन आसीफ खान (२२) या  महिलेने  येथील उप-जिल्हा सामान्य रुग्णालयात पाच दिवसां पूर्वी बाळाला जन्म दिला. वार्ड क्रमांक ५ मध्ये सदर महिला झो पेत असताना  रात्री तीन वाजेच्या सुमारास एका बुरखाधारी  महिलेने  प्रवेश केला. सर्व सामसूम असल्याचे लक्षात आल्यानं तर  तिने सुमय्या परवीन यांच्या बाळाला पिशवीत टाकले व                  पलायन केले. सुमय्या यांना जाग आल्यानंतर बाळ जागेवर  दिसले नसल्याने त्यांनी चौकशी केली, तेव्हा हा प्रकार  उघडकीस आला.  हा संपूर्ण घटनाक्रम सीसी कॅमेर्‍यात कैद  झाला आहे.  घटनेची माहिती मिळताच रुग्णालय अधीक्षक तसेच पोलिसांनी  सामान्य रुग्णालयात धाव घेतली.    फुटेज तपासण्यात  आल्यानंतर बुरखाधारी महिलेने सदर बाळाला एका कारमधून  पळवून नेल्याचे स्पष्ट झाले. या  फुटेजच्या आधारे पोलिसांनी   बाळाचा शोध सुरू केला आहे. याप्रकरणी सुमय्या परवीन      यांचे वडील अय्युबखान  युसूफखान (५0) यांच्या तक्रारीवरून   महिलेविरोधात कलम  ३६३, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.  दरम्यान,   पोलिसांनी पुरूषोत्तम      काळे  या सुरक्षा रक्षकाला ताब्यात घे तले आहे.

पूर्वनियोजित कट !रात्री तीनच्या सुमारास कारमधून येणे, वॉर्ड नं. ५ मध्ये पोहोचून  सुमय्या यांचे बाळ सफाईदारपणे पळवून नेण्याचा हा प्रकार पाह ता तो पूर्वनियोजित कट असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली  आहे. रुग्णालय परिसरात पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला  असावा, अशीही दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. बाळाचा  शोध लावण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान असून, पोलीस सर्व  बाजूने चौकशी करीत आहेत.