खामगावची ‘पेपरलेस’कडे वाटचाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:04 IST2017-08-02T02:04:11+5:302017-08-02T02:04:33+5:30

खामगाव : खामगाव तालुक्यात महसूल दिनानिमित्त सोमवारपासून ऑनलाइन जातीचा दाखला व नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र वितरण सुरू करण्यात आले. 

Khamgaon's 'Paperless' is moving! | खामगावची ‘पेपरलेस’कडे वाटचाल!

खामगावची ‘पेपरलेस’कडे वाटचाल!

ठळक मुद्देई-डिस्ट्रिक्ट प्रणाली सुरू जात, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र डिजिटलघाटाखाली प्रथमच खामगावात सेवा उपलब्ध

खामगाव : खामगाव तालुक्यात महसूल दिनानिमित्त सोमवारपासून ऑनलाइन जातीचा दाखला व नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र वितरण सुरू करण्यात आले. 
 यावेळी मुख्य अतिथी म्हणून खामगावचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण उपस्थित होते. बुलडाणा जिल्ह्यात डिजिटल इंडिया अंतर्गत खामगावला आपले सेवा केंद्रातून ई-डिस्ट्रिक्ट प्रणाली सुरू झाली आहे. महसूल दिनाचे औचित्य साधून जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देणे सुरू झाले आहे. तालुक्यात सर्वात प्रथम रोहणा येथील महा ई-सेवा केंद्रातून नंदा पुंडलिक सावळे काळेगाव यांना उपविभागीय अधिकार्‍यांच्या हस्ते जात प्रमाणपत्र देण्यात आले आहे. या आधी उत्पन्नाचा दाखला, वय, अधिवास प्रमाणपत्र, ३0 टक्के महिला आरक्षण प्रमाणपत्र, शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र, भूमिहीन असल्याचे प्रमाणपत्र, हैसीयत प्रमाणपत्र हे डिजिटल झालेले आहेत. 
या व्यतिरिक्त संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, वृद्धापकाळ योजनासुद्धा ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. यामुळे दलालीला आळा बसेल व ग्रामीण जनतेची होणारी फसवणूक कमी होईल. या सर्व माहितीचे फलक तहसील कार्यालयाच्या आवारात लावले आहेत, तरी नागरिकांनी या सर्व बाबी तपासून पाहाव्यात. ई-डिस्ट्रिक्ट व डिजिटल प्रमाणपत्र वितरणासाठी तहसीलदार सुनील पाटील, गणेश पवार, नायब तहसीलदार योगेश देशमुख, भारत किटे, विजय चव्हाण, श्रीशैल व्हट्टे, पूजा माहोळे, अस्मिता जगताप हजर होते.          

घाटाखाली प्रथमच खामगावात सेवा उपलब्ध
ई-डिस्ट्रिक्ट प्रणालीचा शुभारंभ बुलडाणा येथे याअगोदरच करण्यात आलेला असून, घाटाखाली ही प्रणाली अद्याप सुरु झालेली नव्हती. सोमवारी ही प्रणाली खामगावात प्रथमच सुरु झालेली असून, लवकरच इतर तालुक्यातही सुरु होणार आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी सोय होणार आहे.

नागरिकांना घरबसल्या सेवा मिळावी तसेच लेस पेपर व्हावे याकरिता ई डिस्ट्रीक्ट प्रणाली सुरू करण्यात आली आहे. यापुढे महसुलचे जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमीलेअर ऑनलाईन केलेले आहे. नागरिकांना तहसीलमध्ये येण्याची गरज नाही.
- मुकेश चव्हाण,
उपविभागीय अधिकारी खामगाव
 

Web Title: Khamgaon's 'Paperless' is moving!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.