घरून निघून गेलेल्या खामगावच्या तरुणीने अकोट येथे उरकले शुभमंगल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 15:22 IST2018-07-25T15:18:23+5:302018-07-25T15:22:56+5:30
खामगाव: घरून निघून गेलेल्या एका २० वर्षीय तरुणीने अकोट येथे शुभमंगल उरकल्याचा प्रकार समोर आला आहे.

घरून निघून गेलेल्या खामगावच्या तरुणीने अकोट येथे उरकले शुभमंगल!
खामगाव: घरून निघून गेलेल्या एका २० वर्षीय तरुणीने अकोट येथे शुभमंगल उरकल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवण क्लासला जाण्याचे कारण सांगून ही युवती घरून निघून गेली होती. मुलगी घरी न परतल्यामुळे वडीलांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदविली होती.
खामगाव शहरातील गोपाळ नगर भागातील एक २० वर्षीय युवती २४ जुलै रोजी घरून निघून गेली होती. शिवण क्लासवरून ती परत न आल्यामुळे तिच्या वडीलांनी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली होती. दरम्यान, शिवाजी नगर पोलिस आणि नातेवाईक तिचा शोधात असतानाच, सदर मुलगी स्वत:हून बुधवारी शिवाजी नगर पोलिस स्टेशनला हजर झाली. अकोला जिल्ह्यातील अकोट येथे विवाह केल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. मुलगी पोलिस स्टेशनला हजर झाल्याची माहिती तिच्या नातेवाईकांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलिस स्टेशनवर धाव घेतली. शेवटी पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढून आल्यापावल्या परत पाठविले.