शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

खामगाव : सैनिकांच्या विधवांना मालमत्ता करात सूट; मीरा देशमुख ठरल्या पहिल्या मानकरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 10:06 PM

खामगाव:  संरक्षण दलातील शौर्य पदक धारकांसोबतच माजी सैनिकांच्या विधवांना मालमत्ता करात सूट देण्याच्या ऐतिहासिक निर्णयाचा पहिला मान श्रीमती मीरा रमेशचंद्र देशमुख यांना मिळाला आहे. ३१ डिसेंबर अखेरीस श्रीमती  मीरा देशमुख यांचा संपूर्ण मालमत्ता कर पालिकेने माफ केला आहे.

ठळक मुद्देखामगाव नगर पालिकेने माजी सैनिकांच्या विधवा व संरक्षण दलातील शौर्य पदक धारकांना मालमत्ता करात सूट देण्याचा ठराव मंजूर केला होताश्रीमती मीरा देशमुख ठरल्या या ऐतिहासिक ठरावाच्या पहिल्या मानकरी

अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव:  संरक्षण दलातील शौर्य पदक धारकांसोबतच माजी सैनिकांच्या विधवांना मालमत्ता करात सूट देण्याच्या ऐतिहासिक निर्णयाचा पहिला मान श्रीमती मीरा रमेशचंद्र देशमुख  यांना मिळाला आहे. ३१ डिसेंबर  अखेरीस श्रीमती  मीरा देशमुख यांचा संपूर्ण मालमत्ता कर पालिकेने माफ केला आहे.

 सीमेवर देशाच्या रक्षणासाठी लढणा-या, बलिदान देणा-या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खामगाव नगर पालिकेने माजी सैनिकांच्या विधवांसोबतच संरक्षण दलातील शौर्य पदक धारकांनाही मालमत्ता करातून सूट देण्याचा ठराव मंजूर केला होता.  शौर्य पदक प्राप्त करणा-यांचा यथोचित गौरव करण्यासोबतच, देशासाठी बलिदान, सेवा देणा-या सैनिकांप्रती आत्मियताही  प्रकट करण्याचा पालिकेचा यामागील उद्देश असून दरम्यान, मालमत्ता करात सूट देत, सैनिकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारी खामगाव नगर पालिका जिल्ह्यातील एकमेव पालिका ठरली आहे. दरम्यान, महाराष्ट्र शासन अधिनियम १९६५ चे कलम १०६ च्या पोट कलम (१), (२) अन्वये नगर पालिकेने विनिर्दिष्ठ करण्यात आलेल्या करापासून कोणत्याही वर्गातील मालमत्तेच्या किंवा व्यक्तीच्या संबधात सूट देवू शकते. देण्यात आलेल्या सूटी मुळे, नगर परिषदेला येणाºया तुटीची प्रतिपूर्ती शासनाकडून परत करता येईल. यासंदर्भात सूट देण्याचा शासनाचा अद्यादेशही आहे. त्यामुळे पालिकेच्या या निर्णयामुळे पालिकेचे कोणतेही नुकसान होणार नाही.

नगरसेवक बोर्डे यांनी मांडला होता ठराव!माजी सैनिकांच्या विधवांसोबतच उत्कृष्ठ कामांमुळे शौर्य पदक प्राप्त करणाºया सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्याचा ठराव नगरसेवक हिरालाल बोर्डे यांनी सभेसमोर मांडला. या ठरावाला आरोग्य सभापती राजेंद्र धनोकार यांनी अनुमोदन दिल्यानंतर सर्वांनुमते हा ठराव पारीत करण्यात आला होता. याठरावाबाबत नगराध्यक्ष अनिता डवरे, उपाध्यक्ष संजय पुरवार यांच्यासह नगरसेवकांनी बोर्डे यांचा गौरवही केला होता.

शहरातील इतरांनाही मिळणार लाभ!खामगाव नगर पालिका क्षेत्रातील माजी सैनिकांची यादी सैनिक कल्याण बोर्डांकडून मागविण्याच्या सूचना नगरसेवक हिरालाल बोर्डे यांना देत, खामगाव मतदार संघाचे  आ. आकाश फुंडकर यांनी यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यानुसार नगरसेवक तथा माजी सैनिक हिरालाल बोर्डे यांच्या पुढाकारात पालिका प्रशासनाने सैनिक कल्याण बोर्डांशी पत्रव्यवहार चालविला आहे.

देशासाठी बलिदान देणाºया सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा अतिशय  महत्वपूर्ण निर्णय खामगाव पालिकेने घेतला आहे. या निर्णयाचा पहिला मान माजी सैनिक विधवा पत्नी मीरा  रमेशचंद्र देशमुख यांचा मालमत्ता कर माफ करण्यात आला आहे.- धनंजय बोरीकर, मुख्याधिकारी, खामगाव

देश रक्षणार्थ लढणाºया पतीच्या कार्याचा गौरव म्हणून खामगाव पालिकेने मालमत्ता कर माफ केला आहे.  प्रथम दर्शनी ही लहानशी बाब असली तरी, पतीच्या कार्याची दखल म्हणून ही बाब आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. त्यांच्या देशसेवेचे या निमित्ताने फलित झाले आहे.- श्रीमती मीरा देशमुख, खामगाव 

टॅग्स :khamgaonखामगावMuncipal Corporationनगर पालिका