शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

खामगाव : नांदुर्‍यात ट्रकची दुचाकीला धडक; मुलगा ठार, वडील गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:19 IST

नांदुरा : राष्ट्रीय महामार्गावर भरधावध ट्रक व दुचाकीच्या झालेल्या अपघातात  दुचाकीवरील मुलाचा  मृत्यू तर वडील गंभीर जखमी झाले. ही घटना ४ जानेवारीच्या  रात्री आठ वाजता शहरातील शिवाजी फैलातील रस्त्यावर घडली.            

ठळक मुद्देनादूरा शहरातील शिवाजी फैल भागात गुरुवारी रात्री ८ वाजता घडली घटनाअपघातात मृत पावलेल्या मुलाचे नाव - शेख सोहेल शेख अन्सार

लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : राष्ट्रीय महामार्गावर भरधावध ट्रक व दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीवरील मुलाचा  मृत्यू तर वडील गंभीर जखमी झाले. ही घटना ४ जानेवारीच्या  रात्री आठ वाजता शहरातील शिवाजी फैलातील रस्त्यावर घडली.            पाचोरा येथून  एमएच १८-८१७७  हा ट्रक अकोल्याकडे  माल घेऊन जात होता. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने समोरुन येणा-या  दुचाकीला ट्रकची जबर धडक बसली. यात नांदुरा शहरातील कुरेशी नगर भागातील शे.अंसार  शे. मालिक हे जखमी झाले, तर त्यांचा दहा वषार्चा मुलगा शेख सोहेल शेख अन्सार हा  गंभीर जखमी झाला. उपचारासाठी नेत असतांना त्याची प्राणज्योत मालवली. अपघातात जखमी झालेले  शे.अंसार शे. मालिक यांना पुढील उपचारासाठी खामगाव येथे  हलविण्यात आले आहे. नांदुरा पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

पाच वर्षांपूर्वी याचप्रकारे घडला होता अपघातपाच वर्षांपूर्वी नांदुरा बसस्थानकाजवळ आजोबा आणि नातवाच्या याचप्रकारे घडलेल्या अपघाताच्या स्मृतीना घटनास्थळी जमलेल्यांनी उजाळा दिला. नांदुरा शहरातून जाणार्‍या महामार्गाला पर्याय म्हणून, गेल्या कित्येक वर्षांपासून बायपासचा प्रश्न रखडलेला आहे  आणि त्यामुळेच अपघातांचे प्रमाण वाढले असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया यावेळी उमटल्या.  नागरिकांनी बसस्थानक चौक, शिवाजी फैल, रेल्वे स्टेशन चौकात किमान गतीरोधक तरी बसवावेत, अशी मागणी अनेकदा केली. मात्र, संबंधित विभागाचे अधिकारी त्याकडे कानाडोळा करित असल्याचे चित्र आहे. राजकीय पदाधिकार्‍यांनी बायपासचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी जोर धरत आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावAccidentअपघातDeathमृत्यू