खामगाव ‘टँकर भरोसे’!

By Admin | Updated: April 14, 2015 00:41 IST2015-04-14T00:41:41+5:302015-04-14T00:41:41+5:30

खामगावात विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठा ठप्प.

Khamgaon 'tanker trust'! | खामगाव ‘टँकर भरोसे’!

खामगाव ‘टँकर भरोसे’!

खामगाव (बुलडाणा): धुळीच्या वादळासह आलेल्या अवकाळी पावसामुळे गेरू माटरगाव परिसरात वीज वितरण कं पनीचे विद्युत खांब कोलमडले आहेत. सततच्या अवकाळी पावसामुळे वीज वितरण कंपनीला दुरुस्ती करणे अशक्य असल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून खामगाव शहराला पाणीपुरवठा होत नसल्याने शहर टँकरभरोसे झाले आहे.
शनिवारी दुपारी अचानक धुळीचे वादळ आले. या वादळामुळे काही ठिकाणी झाडे वीज तारांवर पडल्यामुळे विजेचे खांब पडले आहेत. गेरू माटरगाव धरणावर वीजपुरवठा करणारे ३0-४0 विजेचे खांब कोसळल्यामुळे या ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा प्रभावित झाला असून, पाणी वाटपाचे साप्ताहिक नियोजन कोलमडल्यामुळे नागरिकांना टँकरच्या पाणीपुरवठय़ाचा आधार घ्यावा लागत आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहरातील नळ आले नसल्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी चांगलीच धावपळ होत आहे. याशिवाय वीजपुरवठय़ामुळे जनजीवन आणि व्यापारावरही प्रभाव पडला आहे.

Web Title: Khamgaon 'tanker trust'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.