शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

कांदा चाळींचे उद्दिष्ट पूर्णा करण्यात खामगाव तालुका अव्वल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 01:44 IST

मागील वर्षीच्या तुलनेत  खामगाव तालुक्याने कांदा चाळीच्या उद्दिष्टात जिल्ह्यात यावर्षी बाजी  मारली असून, कृषी विभागाने तालुक्यातील ८७५ कांदा चाळींना पूर्णत: मान्यता दिली आहे.  त्यामुळे सर्वाधिक कांदा चाळीचा तालुका म्हणून खामगाव जिल्ह्यात अग्रेसर राहणार असल्याचे  दिसून येते.

ठळक मुद्देराष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ८७५ कांदा चाळींना मान्यतासर्वाधिक कांदा उत्पादन घाटाखाली!

अनिल गवई । लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: अवर्षण आणि पिकांवरील विविध रोगांमुळे संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील शे तकर्‍यांना आता शासन स्तरावरून दिलासा मिळणार असल्याचे सकारात्मक संकेत आहेत.  मागील वर्षीच्या तुलनेत  खामगाव तालुक्याने कांदा चाळीच्या उद्दिष्टात जिल्ह्यात यावर्षी बाजी  मारली असून, कृषी विभागाने तालुक्यातील ८७५ कांदा चाळींना पूर्णत: मान्यता दिली आहे.  त्यामुळे सर्वाधिक कांदा चाळीचा तालुका म्हणून खामगाव जिल्ह्यात अग्रेसर राहणार असल्याचे  दिसून येते.राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कांदा उत्पादक शेतकर्‍यांना कांद्याची साठवणूक करता यावी,  त्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळावा या उद्देशाने अनुदानावर कांदा चाळीचे वितरण करण्यात  येते. यावर्षीदेखील कांदा चाळीसाठी कांदा उत्पादक शेतकर्‍यांसाठी ३0 नोव्हेंबरपर्यंत अर्ज  मागविण्यात आले होते. खामगाव तालुक्यातून प्राप्त झालेल्या सर्वच ८७५ अर्जांना  तालुका कृषी  कार्यालयाकडून पूर्णत: मान्यता देण्यात आली आहे. ही यादी अंतिम मान्यतेसाठी जिल्हास्तरावर  पाठविण्यात आली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत खामगाव तालुक्याने कांदा चाळीची चारपट  अधिक उद्दिष्टपूर्ती केली आहे. तर तालुका कृषी कार्यालयाकडून ५ डिसेंबरपर्यंत अर्ज  स्वीकारण्यात येत आहे. त्यामुळे कांदा चाळीची आकडेवारी वाढण्याचे संकेत आहेत. त्याचवेळी  शेगाव तालुक्यात गेल्या वर्षी १६ तर नांदुरा तालुक्यात  १८ कांदा चाळींची उद्दिष्टपूर्ती झाली होती.  यावर्षी शेगाव तालुक्यात ५७ अर्ज प्राप्त झाले असून, सर्वच अर्जांना अंतिम मान्यता देण्यात आली  आहे. नांदुरा तालुक्यात गेल्या वर्षीच्या तुलनेतदेखील यावर्षी वाढ झाल्याची माहिती आहे. संग्राम पूर आणि जळगाव जामोद तालुक्यानेही कांदा चाळीत तुलनात्मक आघाडी घेतली आहे. दरम्यान,  घाटावरील तालुक्यांमध्ये कांद्याचे उत्पादन कमी असल्याने, तुलनात्मकदृष्ट्या कांदा चाळीची सं ख्या कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. घाटावरील तालुक्यांमध्ये कांद्याऐवजी इतर  िपकांनाच अधिक महत्त्व दिल्या जाते. त्यामुळे घाटावर कांदा उत्पादनाची टक्केवारी कमी आहे.

सर्वाधिक कांदा उत्पादन घाटाखाली!जिल्ह्यात घाटावरील क्षेत्रापेक्षा घाटाखालीच कांद्याचे सर्वाधिक उत्पादन घेतल्या जाते. यामध्ये  घाटाखालील खामगाव, शेगाव, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर या पाच तालुक्यांचा प्रामुख्याने  समावेश आहे. त्याचवेळी  घाटावर कांद्यापेक्षा इतर बागायती पिकांना महत्त्व दिल्या जाते. त्यामुळे  घाटावरील तालुक्यांमध्ये कांद्याचे क्षेत्र कमी आहे. तर घाटाखालील इतर तालुक्यांच्या तुलनेत  खामगाव तालुक्यात सर्वाधिक क्षेत्रावर कांद्याचे उत्पादन घेतले जाते. 

चारपट अधिक उद्दिष्टपूर्ती!राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत  गेल्यावर्षी खामगाव तालुक्यात २५२ कांदा चाळीचे उद्दिष्ट होते;  मात्र यावर्षी तब्बल एक हजारावर कांदा चाळींना पूर्णत: मान्यता दिली जाणार असल्याचे दिसून ये ते. त्यामुळे खामगाव तालुक्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चारपट अधिक उद्दिष्टपूर्ती होणार  आहे.

जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळावा, यासाठी शासन प्रयत्नशील आहे.  आपण स्वत: एक शेतकरी असल्याने, शेतकर्‍यांच्या व्यथा माहिती असल्याने, शेतकर्‍यांना न्याय  देण्याचा प्रयत्न आहे. कांदा चाळीच्या उद्दिष्टात यावर्षी वाढ करण्याचे प्रयत्न आहेत.- भाऊसाहेब फुंडकरकृषी व फलोत्पादन मंत्री, महाराष्ट्र राज्य

कांदा उत्पादनाला चालना देण्यासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कांदा चाळीच्या उद्दिष्टात वाढ  केली आहे. यावर्षी आतापर्यंत ८७५ कांदा चाळींना पूर्णत: मान्यता देण्यात आली आहे.- एस.एस. ढाकणेतालुका कृषी अधिकारी, खामगाव

कांदा चाळीचे अनेक फायदे आहेत. चाळीमुळे कांद्याची चांगली साठवणूक होते. परिणामी,  कांद्याला योग्य तो भाव मिळतो. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतील कांदा चाळीचा लाभ झाला आहे.- जगन्नाथ शेगोकारशेतकरी,  कंझारा, ता. खामगाव. 

टॅग्स :onionकांदा