खामगाव: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २0१४ रोजी घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल सोमवारी दुपारी १ वाजता राज्य शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळवर जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये खामगाव तालुक्याचा ९0.४0 टक्के निकाल लागला असून, यावर्षीही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राहली आहे. खामगाव तालुक्यातील २६ कनिष्ठ महाविद्यालयातील २८७२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले होते. २८७१ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी पास विद्यार्थी २५८५ आहेत. या निकालाची टक्केवारी ९0.४0 इतकी आहे. तालुक्यातील महात्मा ज्योतीबा फुले सायन्स विद्यालय गवंढाळा या शाळेचा १00 टक्के निकाल लागला आहे. तर सर्वात कमी निकाल मिल्लत उदरु ज्युनिअर आटर्स कॉलेज बर्डे प्लॉट खामगाव व रहेमानिया ज्युनिअर कॉलेज कंझारा या दोन शाळेचा सर्वांत कमी निकाल लागला आहे. तर खामगाव येथुन स्व.भास्करराव शिंगणे महाविद्यालयाने बाजी मारली. या शाळेचा निकाल ९९.३0 टक्के निकाल लागला आहे. खामगाव तालुक्यातील शाळा निहाय निकाल अंजुमन हायस्कुल (८३.४0), केला हिंदी विद्यालय (८९.४७), गो.से. महाविद्यालय (९0.३४), जि.प. ज्युनिअर कॉलेज (८४.४२), नॅशनल हायस्कुल (८९.६९), जि.प.ज्युनिअर कॉलेज (मराठी) बोथाकाजी (९५.६५), जि.प.कन्या शाळा (८८.८९), जे.व्ही.मेहता विद्यालय (९४.२६), महात्मा फुले आर्ट्स विद्यालय पळशी (८८.७२), जि.प.सायन्स विद्यालय पिंपळगाव राजा (९६.७0), शासकीय टेक्नीकल ज्युनिअर कॉलेज (८७.७२), महात्मा फुले कला कनिष्ठ महाविद्यालय मांडका (९७.१४), महात्मा ज्योतीबा फुले ज्युनिअर कॉलेज अंत्रज (९0.१६), उदरु ज्युनिअर कॉलेज पिंपळगाव राजा (८४.0६), पृथ्वीराज चव्हाण ज्युनिअर कॉलेज निमकवळा (९४.४४), संत गुलाबबाबा ज्युनिअर कॉलेज वरणा (९0.९१), एल. एन. नॅशनल उदरु ज्युनिअर कॉलेज लाखनवाडा (९५.६५), स्व.बी.भाऊ पाटील विद्यालय बोरी आडगाव (८९.२९), संत नारायण महाराज विद्यालय आंबेटाकळी (९६.३0), सहकार महर्षी स्व.भाऊसाहेब शिंगणे कॉलेज बोरजवळा (९८.0८), स्व. के.आर पाटील ज्युनिअर कॉलेज बोरीआडगाव (८७.८0), महात्मा ज्योतीबा फुले विद्यालय गोंधनापूर (७३.0८) असा लागला आहे.
खामगाव तालुक्यात उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
By admin | Updated: June 4, 2014 00:43 IST