खामगावात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 11:56 AM2020-06-12T11:56:25+5:302020-06-12T11:56:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : शहरातील विकास कामांसाठी आलेल्या तब्बल अडीच कोटी रुपयांच्या निधीला ह्यब्रेकह्ण लावण्यात नगर पालिकेतील विरोधी ...

In Khamgaon, the ruling party and the opposition clashed! | खामगावात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!

खामगावात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: शहरातील विकास कामांसाठी आलेल्या तब्बल अडीच कोटी रुपयांच्या निधीला ह्यब्रेकह्ण लावण्यात नगर पालिकेतील विरोधी सदस्य यशस्वी झाले. नगरोत्थानच्या निधीला अचानक ब्रेक लागल्याने नगर पालिकेतील सत्ताधारी हतबल झाल्याचे चित्र आहे.
राज्यात असलेल्या आघाडी सत्तेचा दुरूपयोग करून शहरातील विकास थांबविल्यांची ओरड पालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून केली जात आहे. त्याचवेळी शहरातील विकास कामे नव्हे, सत्ताधाऱ्यांच्या दूजाभावाला ब्रेक लावून अनियमितता थांबविल्याचा पलटवार विरोधी सदस्यांकडून केला जात आहे.
खामगाव नगर पालिकेसाठी नगरोत्थान अभियानांतर्गत कामे वाटताना विरोधी नगरसेवकांना डावलण्यात आल्याचा आरोप नगर पालिकेच्या विरोधी सदस्यांनी केला. इतकेच नव्हे तर या कामांविरोधात जिल्हाधिकाºयांकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देवेंद्रदादा देशमुख यांच्या पुढाकारातून तक्रार करण्यात आली. देवेंद्र देशमुखांच्या तक्रारीला काँग्रेस गटनेते अमेय सानंदा, माजी नगराध्यक्ष सरस्वती खासणे आणि भारिप बहुजन महासंघाचे विजय वानखडे यांची साथ मिळाली. त्याचवेळी बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजेंद्र शिंगणे यांनीही देवेंद्र देशमुखांच्या  तक्रारीला बळ दिले. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.



आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी!

नगरोत्थांच्या विषयांकित कामांची निविदा थांबविण्यात आल्यानंतर खामगाव पालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. स्थानिक आणि प्रादेशिक स्तरावरील सत्ताकेंद्रांमध्ये जुंपल्याचे प्रथमदर्शनी चित्र पालिकेतील नजीकच्या घडामोडीवरून दिसून येतो.
तक्रारीत अनियमितेवर ठेवले बोट!
  नगरोत्थान अभियानांतर्गत नगर परिषदेमधील सत्ताधा-यांनी बहुमताच्या जोरावर सत्ताधा-यांच्याच प्रभागात विकासकामे घेतली. तसेच प्रस्तावित सर्व विकासकामांचे अंदाजपत्रक हे अव्वाच्या सव्वा दराने तयार करण्यात आले.
 अनेक ठिकाणी नाल्या चांगल्या स्थितीत असतानाही, परत त्या ठिकाणी नवीन नाली बांधकाम प्रस्तावित केल्याचेही तक्रारीत नमूद केले. तर एका प्रभागात ८५ लक्ष रुपयांचे फक्त पेवर ब्लॉक बसविण्याच्या कामाला मान्यता देण्यात आलेली आहे.
  वास्तविक पाहता ज्या ठिकाणी पेहर ब्लॉक बसविण्यात येणार आहे. त्या ठिकाणी नगर परिषद निधीतून नुकतेच रस्त्याचे डांबरीकरण व काही ठिकाणी रस्त्याचे कॉंक्रिंटीकरण सुध्दा करण्यात आलेले आहे. अशा ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविणे म्हणजे शासनाच्या निधीच्या अपव्यय करण्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आल्याने या संपूर्ण प्रकाराची चौकशी आरंभण्यात आली असून सदर चौकशी पूर्ण होईपर्यंत विषयांकित कामांची निविदा थांबविण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी मुख्याधिकाºयांना दिलेत.

राजकारण्यांची कुरघोडी; अधिकारी कोंडीत!
खामगाव शहरातील राजकारणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असते. फुंडकर आणि सानंदा या दोन राजकीय घराण्याचे विळ्या-भोपळ्याचे सख्य संपूर्ण जिल्ह्यात सर्वश्रुत आहे. मात्र, आता खामगाव पालिकेतील सत्ता केंद्राला देवेंद्र देशमुखांनी धक्का दिला. त्यामुळे ऐन कोरोना काळात नगर पालिकेत एकच खळबळ उडाली. या राजकीय कुरघोडीत जिल्हास्तरीय आणि पालिका स्तरीय अधिकारी चांगलेच कोंडीत सापडल्याचे दिसून येते.

Web Title: In Khamgaon, the ruling party and the opposition clashed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.