खामगावात पोलिसांचे ‘ऑल आऊट’ ऑपरेशन; २१ वाहनांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 05:40 PM2020-07-05T17:40:35+5:302020-07-05T17:40:45+5:30

या ऑपरेशनतंर्गत शनिवारी २१ वाहन चालकांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Khamgaon police 'all out' operation; Punitive action on 21 vehicles | खामगावात पोलिसांचे ‘ऑल आऊट’ ऑपरेशन; २१ वाहनांवर दंडात्मक कारवाई

खामगावात पोलिसांचे ‘ऑल आऊट’ ऑपरेशन; २१ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: कोरोना विषाणू अनलॉक कालावधीचा गैरफायदा घेणाºया वाहन धारकांविरोधात शनिवारी खामगावपोलिसांनी ऑआऊट ऑपरेशन राबविले. या ऑपरेशनतंर्गत शनिवारी २१ वाहन चालकांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
कोरोना अनलॉक कालावधीत नागरिकांकडून स्वयंशिस्त पाळण्यात येत नसल्याचे निदर्शनास येताच बुलडाणा जिल्हा पोलिस दलाकडून ऑल आऊट ऑपरेशन राबविण्यात येत आहे. यामध्ये तोंडाला मास्क न लावणे, डबलसीट वाहन चालविणे, वाहतूक नियमांचे पालन न करणाºयांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये कलम १८८, २६९, २७०, साथरोग अधिनियम (३), आपत्ती व्यवस्थापन अधिनियम(५१),  आणि महाराष्ट्र कोविड नियमावली नियम ११ अन्वये कारवाई करण्यात आली.   यामध्ये १८ दुचाकी, दोन चारचाकी वाहने आणि एका आॅटोवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकाºयांच्या आदेशान्वये शनिवारी खामगावात २१ वाहन धारकांविरोधात कारवाई करण्यात आली. कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये, तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे पालन करावे, असे आवाहन शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनिल अंबुलकर यांनी केले आहे.
 
चार दिवसांत ७४३ जणांवर कारवाई
मोटार वाहन कायद्यानुसार खामगाव शहरात १ जुलैपासून ४ जुलैपर्यंत तब्बल ७४३ जणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये शनिवारी ९७ जणांविरोधात शहर पोलिसांनी कारवाई केली.

Web Title: Khamgaon police 'all out' operation; Punitive action on 21 vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.