खामगाव पंचायत समितीमधील ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन कायम
By Admin | Updated: August 23, 2014 02:06 IST2014-08-22T23:46:28+5:302014-08-23T02:06:49+5:30
असहकार आंदोलन कायम : अद्यापही तोडगा निघाला नाही

खामगाव पंचायत समितीमधील ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन कायम
खामगाव : पंचायत समिती अंतर्गत सर्वच ग्रामसेवकांचे स्थानिक प्रशासनाविरोधात विविध प्रलंबित मागण्यासाठी असहकार आंदोलन सुरू आहे. सहा दिवसापासून सुरू असलेल्या या असहकाराबाबत गटविकास अधिकारी व ग्रामसेवकांची चर्चा होवूनही तोडगा निघत नसल्याने असहकार आंदोलन सुरूच आहे.
खामगाव पंचायत समितीअंतर्गत ९६ ग्रामपंचायती आहेत. या सर्वच ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांनी पंचायत समिती प्रशासनाविरोधात १२ ऑगस्टपासून असहकार आंदोलन सुरू आहे. पंचायत समिती कार्यालयात कार्यरत असलेल्या ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांना कार्यमुक्त करून स्वतंत्र पदभार देणे, सीपीएफ, जी.पी.एफ.ची प्रकरणे निकाली काढणे. यासोबत इतर मागण्याकरीता ग्रामसेवक संघटनेने असहकार आंदोलन पुकारले आहे. आंदोलनादरम्यान पंचायत समितीला कोणताही अहवाल न देणे, तसेच पत्रव्यवहार स्विकारणे नाही अशा अटी आहेत. मात्र ग्रामस्थांनी सर्वच कामे करण्याचे ग्रामसेवकांनी ठरविले आहे. या आंदोलनाबाबत १४ ऑगस्ट रोजी गटविकास अधिकारी व ग्रामसेवक संघटनेशी चर्चा झाली असता ग्रामसेवकांच्या अटींची पुर्तता न झाल्याने ग्रामसेवकांनी आंदोलन चालुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.