शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

आॅनलाईन जन्म-मृत्यू नोंदणीत खामगाव पालिका अव्वल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 1:40 PM

खामगाव: कर, बांधकाम आणि नगर रचना विभागाकडून अब्रुचे वाभाडे काढल्या जात असतानाच, खामगाव पालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाकडून एक गोड बातमीय मिळतेय. या विभागातील कर्मचाºयांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे केंद्र शासनाच्या ‘सीआरएस’पोर्टलवर जन्म-मृत्यू नोंदणीत खामगाव पालिका जिल्ह्यात अव्वल ठरली आहे. 

- अनिल गवई

खामगाव: कर, बांधकाम आणि नगर रचना विभागाकडून अब्रुचे वाभाडे काढल्या जात असतानाच, खामगाव पालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाकडून एक गोड बातमीय मिळतेय. या विभागातील कर्मचाºयांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे केंद्र शासनाच्या ‘सीआरएस’पोर्टलवर जन्म-मृत्यू नोंदणीत खामगाव पालिका जिल्ह्यात अव्वल ठरली आहे. 

आॅनलाईन नोंदणीप्रणालीत ३ स्तरावर कार्य केले जाते. यामध्ये सुरूवातीला संस्थांकडून नोंदणी, नंतर पडताळणी आणि नंतर अधिकृत क्यू आर कोड जनरेट केल्या जातो.  ‘सीआरएस’पोर्टलवर जन्म-मृत्यूच्या नोंदणीला जिल्ह्यात जानेवारी २०१६ मध्ये खामगाव पालिकेतून सुरूवात करण्यात आली. सुरूवातीला  काही अडथळे आलीत. मात्र, सर्वच अडथर्ळ्यांची शर्यंत पार करीत,  खामगाव पालिकेने वेळोवेळी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे जन्म-मृत्यूच्या आॅनलाईन नोंदणीत खामगाव पालिकेने जिल्ह्यातील उर्वरित पालिकांना कधीचेच मागे टाकले आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी पालिका म्हणून खामगाव पालिकेचा नाव लौकीक आहे. खामगाव शहरा लगतच्या खेडेगावासह शेगाव, नांदुरा, जळगाव जामोद आणि संग्रामपूर येथील नागरिक खामगाव येथील सामान्य रुग्णालयात प्रसुती आणि उपचारासाठी येथे येतात. त्यामुळे खामगावात जन्म-मृत्यू नोंदणीचे प्रमाण मोठे असून, महिन्याकाठी सरासरी ७०० च्यावर जन्म तर १५० च्यावर मृत्यूची नोंदणी येथे होते. तथापि, जन्म-मृत्यू आणि रेकॉर्ड विभागातील विभाग प्रमुख राजेश मुळीक, कमलाकर चिकणे, चेतन सारसर या अवघ्या तीन कर्मचाºयांनी जन्म-मृत्यू नोंदणी विभागाला नगराध्यक्ष अनिता डवरे, मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांच्या मार्गदर्शनात नावलौकीक मिळवून दिला. त्यामुळे या विभागातील कर्मचाºयांचे जिल्हास्तरावर कौतुक होत आहे.

 

प्रमाणपत्राची अधिकृत पडताळणी सहज शक्य!

आॅनलाईन नोंदणी झालेल्या जन्म-मुत्यू प्रमाणपत्रावर ‘क्यू आर कोड’ प्रणालीचा व डिजीटल स्वाक्षरीचा वापर करण्यात येतो.  त्यामुळे प्रमाणपत्रांची अधिकृत पडताळणी करणे सहज शक्य आहे.

 

जन्म-मृत्यू/ रेकॉर्ड विभागाचे अद्ययावतीकरण!

खामगाव पालिकेतील जन्म-मृत्यू आणि रेकॉर्ड विभागाचे अद्ययावतीकरण करण्यात आले. सोबतच संपूर्ण संगणकीकृत प्रणाली या विभागात कार्यान्वित करण्यात आली. पालिकेतील सर्वात जास्त रेकॉर्ड या विभागात आहेत. हे रेकॉर्ड गठ्ठा पध्दतीने सुस्थितीत संग्रहीत ठेवण्यात आलेत. तसेच विभागात येणाºया नागरिकांना विनामुल्य अर्ज नमुने, पिण्याचे पाणी, बसण्याची सुविधा देखील येथे उपलब्ध आहे.

 

दंडामुळे विलंबाने नोंदणीस चाप!

शासकीय तसेच खासगी रुग्णालय तसेच पोलिस स्टेशन कार्यक्षेत्रातील जन्म-मृत्यूची विहित मुदतीत नोंदणी करण्यासाठी सुरूवातीला पत्रव्यवहार करण्यात आला. त्यानंतर नोंदणीमध्ये विविध सुधारणा करण्यात आल्या. नोंदणीस विलंब झालेल्या संस्थांना विलंब शुल्क आकारण्यात आले. त्यामुळे विलंबाने नोंदणीस चाप बसला असून, नागरिकांचा त्रास कमी झाला.

 

आॅनलाईन जन्म नोंदणी (जाने. २०१६ पासून)

सन    पुरूष    स्त्री    एकुण

२०१६    ३५५७    ३३३५    ६८९२

२०१७    ३९८३    ३६८९    ७६७२

२०१८    ३०३८    २७१०    ५७४८(सप्टेंबरपर्यंत)

 

आॅनलाईन मृत्यू नोंदणी (जाने. २०१६ पासून)

सन    पुरूष    स्त्री    एकुण

२०१६    ५७८    ३६१    ९३९

२०१७    ४९७    ३३७    ८३५(तृतीयपंथी-१)

२०१८    ३७१    २३५    ६०६(सप्टेंबरपर्यंत)

आॅनलाईन जन्म-मृत्यू नोंदणीस खामगाव पालिकेकडून प्राधान्य दिले जात आहे. या नोंदणी प्रक्रीयेतील सर्व अडथळे दूर करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात खामगाव पालिकेचा नावलौकीक उंचावला आहे.

- राजेश मुळीक, विभागप्रमुख जन्म-मृत्यू विभाग, नगर परिषद, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा