खामगाव पालिकेची अडीच कोटींची करवसुली

By Admin | Updated: February 14, 2015 01:47 IST2015-02-14T01:47:17+5:302015-02-14T01:47:17+5:30

७0 टक्के कर वसुली बाकी; दोन महिन्यात वसूल करावे लागतील ५ कोटी.

Khamgaon municipal tax collection of 2.5 crore | खामगाव पालिकेची अडीच कोटींची करवसुली

खामगाव पालिकेची अडीच कोटींची करवसुली

खामगाव (जि. बुलडाणा) : नगर परिषद कर विभागाकडून या वित्तीय वर्षात आतापर्यंत २ कोटी ६४ लाख ३५ हजार ५३४ रुपये कर संपत्ती करापोटी वसूल करण्यात आली आहे. नगर परिषदेला वित्तीय वर्षात ७ कोटी ७७ लाख ७ हजार ८७७ रुपये वसूल करावे लागणार आहेत. म्हणजेच दोन महिन्यात ५ कोटी १२ लाख ७२ हजार ३४३ रुपये वसूल करावे लागणार आहेत. गत वर्षातील आकडेवारीवर नजर टाकली असता फक्त मार्च महिन्यातच अडीच कोटी रुपयांची वसुली नगर परिषदेच्या करविभागाकडून करण्यात आली होती. त्यामुळे येत्या मार्च महिन्यात कर विभाग हा आकडा पार करू शकतो. खामगाव नगर परिषद क्षेत्रात सुमारे २४ हजार करदाता आहेत. नगर परिषदेकडून या मालमत्ताधारकांवर दरवर्षी कर आकारण्यात येतो. या वित्तीय वर्षात मालमत्ता करामध्ये वाढ करण्यात आली आहे. या वाढविरोधात सुमारे ८00 करधारकांनी अपील केले आहे. या अपिलांवर प्रथम सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे उर्वरित मालमत्ताधारकांकडून करवसुली करण्यात येत आहे. नगर परिषदेच्या १४ करसंग्राहकांकरवी शहरातील ८ प्रभागातून करवसुली करण्यात येत आहे. आतापर्यंंत एप्रिल २0१४ ते फेब्रुवारी २0१५ पर्यंत २ कोटी ६४ लाख रुपये करवसुली झाली आहे. २0१४-१५ या वित्तीय वर्षात कर विभागाला ७ कोटी ७७ लाख ७ हजार ८७७ रुपये वसुलीचे उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टापैकी आतापर्यंंत २ कोटी ६४ लाख ३५ हजार ५३४ रुपयांची करवसुली करण्यात आली आहे. ही वसुली उद्दिष्टाच्या तुलनेत ३0 टक्के झाली आहे. तर संपूर्ण उद्दिष्टपूर्तीसाठी येत्या दीड महिन्यात ५ कोटी १२ लाख ७२ हजार ३४३ रुपयांची करवसुली करावी लागणार आहे.

Web Title: Khamgaon municipal tax collection of 2.5 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.