खामगाव नगराध्यक्षांकडून कर्मचाºयांची झाडाझडती!
By Admin | Updated: May 5, 2017 13:46 IST2017-05-05T13:46:32+5:302017-05-05T13:46:32+5:30
नगराध्यक्षांच्या या कारवाईमुळे पालिका कर्मचाºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

खामगाव नगराध्यक्षांकडून कर्मचाºयांची झाडाझडती!
खामगाव: नगर पालिकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांची गैरहजेरी लक्षात घेता, पालिकेचे ढेपाळलेले कामकाज सुरळीत करण्यासाठी नगराध्यक्षांकडून पालिका कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेण्यात आली. नगराध्यक्षांच्या या कारवाईमुळे पालिका कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नगर पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत रोडे साप्ताहिक रजेवर गेले आहेत. मुख्याधिकारी कर्तव्यावर हजर नसल्याची संधी साधत, पालिका कर्मचाऱ्यांकडून दांडी मारण्याचे प्रकार वाढीस लागले होते. दरम्यान, या प्रकाराची चुणूक लागताच नगराध्यक्ष अनिता डवरे यांनी पालिकेच्या सर्व विभागात जावून कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. यावेळी गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांना समज देण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष संजय मुन्ना पुरवार यांचीही उपस्थिती होती.