खामगाव पालिका मुख्याधिकारी नामवाड निलंबित
By Admin | Updated: February 19, 2016 01:31 IST2016-02-19T01:31:11+5:302016-02-19T01:31:11+5:30
खामगाव येथील गणेशमूर्ती विटंबना प्रकरण; नगर विकास मंत्रालयाने केली कारवाई.

खामगाव पालिका मुख्याधिकारी नामवाड निलंबित
खामगाव : नगर परिषदेच्या फिरत्या जलकुंडात शहरवासीयांनी विश्वासाने विसजिर्त केलेल्या गणेशमूर्ती डंपिंग ग्राऊंडवर फेकून विटंबना केल्याप्रकरणी येथील नगर परिषदचे मुख्याधिकारी धोंडिबा नामवाड यांना नगर विकास मंत्रालयाने राज्यपाल यांच्या आदेशावरून एका पत्राद्वारे निलंबित केले आहे. या कारवाईमुळे नगर परिषद व तरुळात एकच खळबळ उडाली. मागीलवर्षी २९ सप्टेंबर १५ रोजी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी नगर परिषदेच्या फिर त्या जलकुंडात विसजिर्त केलेल्या गणेशमूर्ती नगर परिषदने डंपिंग ग्राऊंडवर कचर्यात टाकून विटंबना केली होती. या प्रकारामुळे नागरिकांच्या भावना दुखवून त्यांचा नगर परिषद प्रशासनाने विश्वासघात केला, अशा आशयाची तक्रार दत्तगुरू गणेश मंडळाचे अध्यक्ष ओम शर्मा यांनी शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये तर भाजयुमोचे राम मिश्रा यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली हो ती. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी मुख्याधिकारी धोंडीबा नामवाड, नगराध्यक्ष अशोक सानंदा यांच्यासह इतरांविरोधात कलम २९५, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आ.भाऊसाहेब फुंडकर यांनी नागपूर अधिवेशनात तारांकित प्रश्न मांडून कारवाई करण्याची मागणी केली होती.