शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

खामगाव पालिका कर्मचारी ड्युटीवरून थेट संपावर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 08:29 IST

कर वसुलीचा अखेरचा दिवस असल्याने खामगाव पालिकेतील कर्मचाऱ्यांनी रात्री 12 वाजेपर्यंत कार्यालयात सेवा दिली. कामकाज आटोपताच कर्मचारी लागलीच संपावर गेले आहेत.

ठळक मुद्देकर वसुलीचा अखेरचा दिवस असल्याने खामगाव पालिकेतील कर्मचाऱ्यांनी रात्री 12 वाजेपर्यंत कार्यालयात सेवा दिली. कामकाज आटोपताच कर्मचारी लागलीच संपावर गेले आहेत.कर्मचारी कार्यालयीन कामकाज आटोपल्यानंतर सहा तासांनी तर कर विभागातील 27 कर्मचारी केवळ एका मिनिटांच्या अंतराने संपात सहभागी झाले.

अनिल गवई

खामगाव -  कर वसुलीचा अखेरचा दिवस असल्याने खामगाव पालिकेतील कर्मचाऱ्यांनी रात्री 12 वाजेपर्यंत कार्यालयात सेवा दिली. कामकाज आटोपताच कर्मचारी लागलीच संपावर गेले आहेत.

नगर पालिका कर्मचाऱ्यांना विनाअट सातवा वेतन आयोग लागू करावा, रोजंदारी कर्मचारी कायम करणे, 24 वर्ष कालबद्ध पदोन्नतीची थकबाकी आदी 20 मागण्यांकरिता  कर्मचारी संघटनेने 1 जानेवारीपासून बेमुदत संपाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार खामगाव पालिकेतील कर्मचाऱ्यांनी 29 डिसेंबरपासूनच विविध आंदोलनाला सुरूवात केली. मात्र, अपेक्षीत कर वसुलीसाठी खामगाव पालिका कर विभागातील कर्मचाऱ्यांनी 31 डिसेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत कामकाज केले. कामकाज आटोपताच कर्मचारी संपात सहभागी झाले. पालिकेचे इतर कर्मचारी कार्यालयीन कामकाज आटोपल्यानंतर सहा तासांनी तर कर विभागातील 27 कर्मचारी केवळ एका मिनिटांच्या अंतराने संपात सहभागी झाले. कर निरिक्षक एस.के.देशमुख, एस.सी. हातोले, आर.बी.शहा, रितेश तिवारी, ए.एस. गवई, व्ही.एम.कपिले, व्ही.एन. सोळंके, एस.बी.मावळे, ए.बी.गोलाईत, एम.पी.सदावर्ते, बी.एल.व्यास, आर.आर.तिवारी, व्ही.जी. हिवराळे, जी.झेड चव्हाण, व्ही.एस. निंबोळकर, आर.के. तिवारी, डी.एल.वाशीमकर, एम.एच.अवकाळे, ए.टी.आसोडे, डी.आर.कल्याणकर,  व्ही. एम. अग्नीहोत्री, एस.के. हेलोडे, ए.एस.देशमुख, डी.एम. ठाकूर, व्ही.व्ही.मगर आदी कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

राज्यव्यापी आंदोलनाला पाठींबा!

नगर पालिका आणि महानगर पालिकेतील कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाला खामगाव येथील कर्मचाऱ्यांनी पाठींबा दर्शविला आहे. त्याअनुषंगाने न.प.कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनंत निळे, व महाराष्ट्र राज्य न.प.कर्मचारी संघटनेचे कार्यकारी सदस्य मोहन अहिर यांच्यासह नेतृत्वात पालिका कर्मचारी संपावर गेले आहेत.

टॅग्स :khamgaonखामगावStrikeसंप