#खामगाव कृषी महोत्सव : बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी कामगंध सापळे उभारा - उंदिरवाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 01:59 AM2018-02-20T01:59:43+5:302018-02-20T01:59:52+5:30

खामगाव: कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने यावर्षी शेतकर्‍यांचे  नुकसान झाले. कपाशीवर पडणार्‍या बोंडअळीला वेळीच आवर घालण्यासाठी  शेतकर्‍यांनी योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. 

# Khamgaon Krishi Mahotsav: Organizing Kangad Traps for the management of Bondhali - Umdirwade | #खामगाव कृषी महोत्सव : बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी कामगंध सापळे उभारा - उंदिरवाडे

#खामगाव कृषी महोत्सव : बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी कामगंध सापळे उभारा - उंदिरवाडे

Next

ब्रम्हानंद जाधव। 
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने यावर्षी शेतकर्‍यांचे  नुकसान झाले. कपाशीवर पडणार्‍या बोंडअळीला वेळीच आवर घालण्यासाठी  शेतकर्‍यांनी योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. 
सुरुवातीला कामगंध सापळे शेतात लावले तर पतंग त्यात अडकतील व  बोंडअळीचा प्रादुर्भाव जाणवणार नाही, त्यामुळे प्रत्येकाने कामगंध सापळे शेतात  उभारावे, असे आवाहन  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे  कीटकशास्त्र विभागप्रमुख डॉ.डी.बी. उंदिरवाडे यांनी  केले.
 खामगाव येथील कृषी महोत्सवामध्ये १९ फेब्रुवारी रोजी मार्गदर्शन सत्रात ते ‘का पुस शेंदरी बोंडअळी व्यवस्थापन’ या विषयावर बोलत होते. पुढे बोलताना  डॉ.डी.बी. उंदिरवाडे म्हणाले की, बोंडअळी ही तीन प्रकारची असते. त्यामध्ये  अमेरिकन बोंडअळी जी हिरवी असते  आणि ती विविध पिकांवर येते. दुसरी ठि पक्याची बोंडअळी. ही अळी पाकळ्यांवर विष्ठा टाकते. काळसर आणि पट्टेदार  असते, तर तिसरी गुलाबी बोंडअळी आहे. फूल, पान, पाकळ्या आणि बोंडाच्या  देठाजवळ ही अळी दिसून येते. गुलाबी बोंडअळी कापसाच्या सिड्समध्येसुद्धा  राहते. बोंडअळीच्या पतंगाचा वेळीच नायनाट करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी शे तात कामगंधा सापळे उभारावे. यावेळी कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शे तकरी उपस्थित होते. 

Web Title: # Khamgaon Krishi Mahotsav: Organizing Kangad Traps for the management of Bondhali - Umdirwade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.