खामगाव-जालना महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लवकरच!

By Admin | Updated: July 21, 2016 00:52 IST2016-07-21T00:52:48+5:302016-07-21T00:52:48+5:30

आ. फुंडकरांच्या तारांकित प्रश्नावर बांधकाम मंत्री पाटील यांची ग्वाही

Khamgaon-Jalna highway work will be completed soon! | खामगाव-जालना महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लवकरच!

खामगाव-जालना महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लवकरच!

खामगाव : खामगाव- जालना महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरू करणार असल्याची ग्वाही आ.अँड. आकाश फुंडकर यांच्या तारांकित प्रश्नावर सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात खामगाव-जालना महामार्गाबाबत आ.अँड. फुंडकर यांनी बुधवारी विधानमंडळात तारांकित प्रश्न मांडले. गेल्या अनेक वर्षांंपासून खामगाव-जालना रस्त्याचे चौपदीकरणाचे काम रखडले आहे. अर्धवट काम झाल्याने अनेक नागरिकांचा अपघाती मृत्यू झाला. रस्ता खराब असल्यामुळे आजही अपघात होत आहेत. त्यामुळे नव्याने हे काम तातडीने हाती घेऊन पूर्णत्वास न्यावे, अशी आग्रही मागणी आ.अँड. फुंडकर यांनी सभागृहात केली. याला सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री ना. पाटील यांनी उत्तर दिले. खामगाव-चिखली-देऊळगाव राजा-जालना हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला असून, चौपदरीकरणाचे काम सुरू केले जाईल व चांगल्या दर्जाचा सुंदर रस्ता पूर्णत्वास नेऊ, अशी ग्वाही ना.पाटील यांनी यावेळी दिली.

Web Title: Khamgaon-Jalna highway work will be completed soon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.