खामगाव येथील अतिक्रमण पालिकेच्या रडारवर !

By Admin | Updated: December 2, 2015 02:28 IST2015-12-02T02:28:10+5:302015-12-02T02:28:10+5:30

१८ फ्लेक्स बोर्ड जप्त, रहदारीस अडथळा ठरणारे अतिक्रमणही हटविणार.

Khamgaon encroachment on the radar of the Municipal Corporation! | खामगाव येथील अतिक्रमण पालिकेच्या रडारवर !

खामगाव येथील अतिक्रमण पालिकेच्या रडारवर !

खामगाव : अतिक्रमणासोबतच रस्त्यावर विविध ठिकाणी लावण्यात आलेले जाहिरात फलक काढण्याची धडक मोहीम नगरपालिकेने सोमवारी राबविली. यामुळे अतिक्रमकांमध्ये धडकी भरली आहे. नगरपालिका प्रशासनाच्यावतीने अनधिकृत फलक आणि रस्त्यावरील अतिक्रमकांविरोधात सोमवारी मोहीम उघडण्यात आली. या मोहिमेंतर्गत रात्रीपर्यंंंंत १८ फ्लेक्स आणि १ मोठा लोखंडी जाहिरात फलक जप्त करण्यात आला आहे. नगरपालिका प्रशासनाच्यावतीने शहरात वेळोवेळी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येते; मात्र या मोहिमेचा तात्कालीक प्रभाव होतो. काही कालावधीनंतर पुन्हा अतिक्रमण जैसे थे होत असल्याने रस्त्यांचा श्‍वास कोंडल्या जात आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नगरपालिका प्रशासनाने आता शहरातील अतिक्रमण आणि रस्त्यांचे विद्रुपीकरण करणार्‍या फ्लेक्स विरोधात तीव्र मोहीम उघडली आहे. या मोहिमेंतर्गत बाळापूर बायपास ते जी. एस. कॉलेज, नांदुरा मार्गावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत जाहिरात तसेच फ्लेक्स बोर्ड आणि एक लोखंडी जाहिरात फलक जप्त करण्यात आला. मुख्याधिकारी डी. ई. नामवाड यांच्या मार्गदर्शनात अतिक्रमण निर्मूलन पथकातील मोहन अहीर, अनंत निळे, मंगेश पंचभुते यांच्यासह काही चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी या कारवाईत सहभाग दिला. दरम्यान, पालिकेच्या या कारवाईमुळे अवैध फ्लेक्स बोर्ड लावणारे सध्या धास्तावलेले आहेत. आणखी काही दिवस पालिकेची ही कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत पालिकेतील सुत्रांनी दिले आहे. रस्त्यावरील अतिक्रमणही कळीचा मुद्दा आहे.

Web Title: Khamgaon encroachment on the radar of the Municipal Corporation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.