शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

खामगाव : घाटाखाली काँग्रेसचे ‘पकोडे पकाओ’आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 01:14 IST

खामगाव : सुशिक्षीत तरुण हा देशाचा आधारस्तंभ आहे. परंतू सध्या देशामध्ये करोडो सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार मिळालेला नाही. आई-बाबा म्हणतात शिका आणि सरकार म्हणते पकोडे विका हा प्रकार बेरोजगारांची थट्टा करणारा आहे असा आरोप माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केला. 

ठळक मुद्देसुशिक्षित बेरोजगार युवकांची सरकारवर टीका 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : सुशिक्षीत तरुण हा देशाचा आधारस्तंभ आहे. परंतू सध्या देशामध्ये करोडो सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार मिळालेला नाही. आई-बाबा म्हणतात शिका आणि सरकार म्हणते पकोडे विका हा प्रकार बेरोजगारांची थट्टा करणारा आहे असा आरोप माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केला. खामगावातील एकबोटे चौकात १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते १ वाजेपयर्ंत पकोडे वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी सानंदा यांनी मोदी सरकारवर कडाडून टिका केली. मोदींनी आम्ही सत्तेत आल्यानंतर दरवर्षी २ कोटी सुशिक्षीत बेरोजगारांना काम देवू, असे सांगुन सुशिक्षीत बेरोजगारांचा विश्‍वासघात केला आहे. सुशिक्षीत युवकांनी  संघटीत होउन विश्‍वासघातकी मोदी सरकारला आगामी निवडणुकीत त्यांची जागा दाखवेल असे प्रतिपादन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले. यावेळी तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.सदानंद धनोकार, कृउबास सभापती संतोष टाले, महिला तालुकाध्यक्षा सौ.भारती पाटील, न.प.कॉंग्रेस पक्षनेत्या सौ.अर्चनाताई टाले, माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने, कॉंग्रेस अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष वसीमोदद्ीन, तालुकाध्यक्ष बबलु पठान, युवक कॉंग्रेस ब्रिगेडचे अध्यक्ष तुशार चंदेल, नगरसेवक राणा अमेयकुमार सानंदा, युवक कॉंग्रेसचे  अध्यक्ष दामोदर वडोदे, शहर कॉंग्रेस कमिटीचे सचिव अशोक मुळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या आंदोलनात शेकडो सुशिक्षीत बेरोजगार तरुण-तरुणी, कॉंग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.

जळगांव जामोद : युवक काँग्रेस ने केले पकोडे वाटप आंदोलनआज १४/२/२0१८ रोजी युवक काँग्रेस जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघाच्या वतीने स्थानिक तहसिल कार्यालयासमोर पकोडे वाटप आंदोलन करण्यात आले।भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका टीव्ही शो च्या मुलाखती दरम्यान भारतातील सर्व सुशिक्षित बेरोजगार युवकांसबधी बेताल वक्त्यव्य करून सुशिक्षित बेरोजगार युवकांनी पकोडे तडन्याचे कामे करावी व स्वयंरोजगार निर्मिती करावी।असे बेताल वक्तव्य करून भारतभरातिल बेरोजगार युवकांचा अपमान केला।वास्तविक पाहता सत्तेत येण्यापूर्वी भाजपा पक्षाने रोजगार निर्मिती मोठया प्रमाणावर केल्या जाईल अशी खोटी व भुरळ पडणारी आश्‍वासने दिली।वास्तविक शासनाला चार वर्षे पूर्ण होऊन देखील रोजगार निर्मिती शून्य आहे तसेच देशाचा जीडीपी दर ही दिवसेंदिवस घसरत आहे।तरी सुद्धा मोदी उर्मटपणे अशी वक्तव्य करून युवकांचा अपमान करीत आहेत. त्याचा याठिकाणी जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी युवक काँग्रेस चे विधानसभा अध्यक्ष पराग पाटील, नितीन ढगे,अमर पाचपोर,नंदू बाठे, डॉ. प्रशांत राजपूत, सैय्यद हुसेन राही, महिला काँग्रेसच्या ज्योतीताई ढोकणे, प्रकाश पाटील, ता.अध्यक्ष राजु पाटील, युनूस खान, नगरसेवक अर्जुन घोलप, संदीप मानकर, श्रीकृष्ण केदार, मोदसिर काजी, प्रवीण भोपळे, सचिन हरमकार, अरुण दीघडे, मयूर राऊत, राहुल ढोले, पंकज घुते, केतन विभानी, विश्‍वास पाटील,मोहन बोडखे, जावेद खान, अँड. राजपूत, आशिष वायझोडे,माणिक खोद्रे, दिनेश काकडे, गणेश मोरे, विलास मानकर ,शकिर खान व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते हजर होते 

टॅग्स :khamgaonखामगावcongressकाँग्रेसagitationआंदोलन