शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

खामगाव बसस्थानक बनले असुविधांचे माहेरघर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 4:56 PM

खामगाव : येथील बसस्थानकामध्ये अनेक सुविधांचा अभाव दिसून येत आहे. ऐन उन्हाळ्याच्या काळात बसस्थानकातील सर्व पंखे बंद असल्याने प्रवाशांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : येथील बसस्थानकामध्ये अनेक सुविधांचा अभाव दिसून येत आहे. ऐन उन्हाळ्याच्या काळात बसस्थानकातील सर्व पंखे बंद असल्याने प्रवाशांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तर प्रवाशांच्या मनोरंजनासाठी लावण्यात आलेली एलसीडी टिव्ही काढून टाकण्यात आली आहे.खामगाव बस हे मध्यवर्ती बसस्थानक आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रवाशांची गर्दी दिसून येते. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिद वाक्य घेवून सेवेत असलेल्या परिवहन मंडळाकडून मात्र प्रवाशांना कुठलीच सुविधा पुरविल्या जात नसल्याचे दिसून येत आहे. सध्या खामगाव शहराचे तापमान ४२ ते ४५ अंश सेल्सीअस पर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे नागरीकांच्या जिवाची लाही-लाही होत आहे. त्यातच येथील बसस्थानकामधील सर्वच पंखे बंद असल्याने प्रवाशांना उकाड्याचा भयंकर त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाळा लागण्याच्या अगोदरच बसस्थानकातील पंखे स्थानक प्रशासनाकडून दुरूस्त करणे गरजेचे होते. परंतु याकडे आगार प्रमुख आणि नियंत्रकांचे कुठलेच लक्ष नसल्याचे समजते. स्थानकात एकुण १५ ते १६ पंखे लावण्यात आलेले आहेत. त्यापैकी १२ पंखे बंद असून ४ ते ५ पंखे गायब असल्याचे निदर्शनास आले. याचबरोबर बसस्थानकात प्रवाशांच्या मनोरंजनासाठी लावण्यात आलेली एलसीडी टिव्ही अनेक दिवसापासून गायब झालेली आहे. याकडेही बसस्थानक प्रशासनाचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. खामगाव बसस्थानकाला दरवर्षी कोट्यावधीचे उत्पन्न प्रवाशांकडून मिळत आहे. परंतु त्या मानाने कुठल्याच सुविधा मिळत नसल्याची ओरड प्रवाशांकडून होत आहे. तरी बसस्थानक प्रशासनाने तातडीने पंखे दुरूस्त करून प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी प्रवाशी वर्गाकडून होत आहे. महिलांचे शौचालय रात्री असते बंदबसस्थानकातील महिलांचे शौचालय रात्रीच्या वेळेस बंद असल्याने महिला प्रवाशांची गैरसोय होत आहे. शौचालय बंद असल्याने महिला प्रवाशांना रात्री उघड्यावरच अंधाराचा सहारा घ्यावा लागत आहे. त्यामुळे महिलांची कुचंबना होत असल्याची ओरड महिला प्रवाशांकडून होत आहे.नियंत्रण कक्षातील पंखा सुरूबसस्थानकातील नियंत्रण कक्षात बसलेल्या कर्मचाऱ्यांचाच पंखा सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. तर प्रवाशांसाठी लावण्यात आलेले पंखे बंद असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केल्या जात आहे.

टॅग्स :khamgaonखामगाव