खामगाव आगाराला ‘आषाढी’ पावली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2017 00:38 IST2017-07-11T00:19:38+5:302017-07-11T00:38:37+5:30

खामगाव आणि परिसरातून असंख्य वारकऱ्यांनी राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून प्रवास केला. यातून खामगाव आगाराला २० लाख ७६ हजार ७७८ रुपयांचे उत्पन्न मिळाले.

Khamgaon Agara got 'Ashadhi'! | खामगाव आगाराला ‘आषाढी’ पावली!

खामगाव आगाराला ‘आषाढी’ पावली!

अनिल गवई।
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनी असलेल्या असंख्य वारकऱ्यांच्या ‘आषाढ’वारीमुळे खामगाव आगाराच्या उत्पन्नात चांगलीच भर पडली आहे. खामगाव आणि परिसरातून असंख्य वारकऱ्यांनी राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून प्रवास केला. यातून खामगाव आगाराला २० लाख ७६ हजार ७७८ रुपयांचे उत्पन्न मिळाले.
आषाढी एकादशीला पायीवारी करू न शकणारे भाविक रेल्वे आणि इतर प्रवासी साधनांचा वापर करून पंढरपूर गाठतात. तथापि, रेल्वेत आरक्षण अथवा जागा न मिळणारे भाविक एसटीला प्राधान्य देतात. त्यामुळे पंढरपूर यात्रेनिमित्त एसटीवरदेखील भाविकांची मोठी गर्दी असते. भाविकांच्या गर्दीचा अंदाज घेत, एसटी महामंडळाच्या खामगाव आगाराकडून पंढरपूर यात्रा विशेष बस गाड्यांचे नियोजन केले जाते. यावर्षीही खामगाव आगारातून ६१ गाड्यांचे नियोजन केले होते. २६ जुलैपासून अतिरिक्त बसेस खामगाव येथून पंढरपूरकडे सोडण्यात आल्या. दरम्यान, १, २ आणि ३ जुलै रोजी खामगाव आगारातून ३६ गाड्या सोडण्यात आल्या. सोबतच गुरुपौर्णिमेपर्यंत म्हणजेच २६ जून ते ९ जुलै या कालावधीत एसटीने ११६ फेऱ्या केल्या.

Web Title: Khamgaon Agara got 'Ashadhi'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.