शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

खामगाव : भूखंड घोटाळ्यात आरोपी वाढण्याची शक्यता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 4:36 PM

Khamgaon News साक्षीदार आणि बनावट सातबारा देणारांचाही पोलिसांकडून आता कसून शोध घेतल्या जात आहे.

 - अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : शहरातील कोट्यवधी रुपयांच्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आतापर्यंत १४ आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. याप्रकरणी आरोपी वाढण्याची दाट शक्यता असून, साक्षीदार आणि बनावट सातबारा देणारांचाही पोलिसांकडून आता कसून शोध घेतल्या जात आहे. त्यामुळे शहरातील भुखंड माफीया आणि त्यांच्या चेलेचपाट्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.खामगाव भाग-१ चा तत्कालीन तलाठी राजेश चोपडे याने त्याच्या कार्यकाळात मुळ हस्तलिखीत ७/१२ मध्ये बनावट नोंदी केल्या. या बनावट नोंदी करून त्या आधारे संगणकीकृत ७/१२ तयार केलेत. याद्वारे खामगाव उपविभागातील ९४ पेक्षा अधिक सातबाऱ्यांची मालकी बदलवून दुसऱ्यांच्या नावावर खरेदी करून देणाऱ्या  चोपडेने वरिष्ठांचीही दिशाभूल केली. दरम्यान, याप्रकरणी वर्षभरात १४ आरोपींना अटक करण्यात आली.  यातील काही आरोपी अद्यापही फरार असून, बनावट सातबारा तयार करण्यात आल्यानंतर खरेदी करून देणाऱ्यास उपलब्ध करणाऱ्यांचाही पोलिस प्रशासनाकडून आता शोध घेतल्या जात आहे. याप्रकरणी सहकाºयाची फसवणूक आणि अनेकांना ‘ठेंगा’ दाखविणारा एक जण काही दिवस फरार होता. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यास यात आरोपी वाढण्याची दाट शक्यता आहे.

अटक करण्यात आलेले १४ आरोपी!भुखंड घोटाळ्यात आतापर्यंत शहर पोलीसांनी मुख्य सुत्रधार राजेश ज्ञानदेव चोपडे(५१) रा. रॅलीज प्लॉट खामगाव, ललीत शेषराव झाडोकार (४०) , स्वप्नील शेषराव झाडोकार (३७) दोघेही रा.संजिवनी कॉलनी, खामगाव, लक्ष्मण प्रल्हाद फाळके (६४) रा. टाकळी हाट ता. शेगाव, देविदास किसन राजनकर (६९), मुकींदा हरीश्चंद्र उमाळे (५०), समाधान शंकर वाघ (७०) तिघेही रा. पातुर्डा खुर्द ता. संग्रामपूर,  रमेश वासुदेव राऊत (४५),  रा. पारखेड ता. खामगाव, प्रभाकर मुकदन पिसे (४९) रा. पाडसुळ ता.शेगाव, शैलेश श्रीकृष्ण चोपडे (२९) रा. वृंदावन नगर वाडी ता. खामगाव, गोपाळराव पांडुरंग तायडे (८५) रा. हिंगणा निंबा ता. बाळापूर जि. अकोला, गुलाबराव हरीभाऊ क्षिरसागर (७०) रा. रोहीणखेड ता. मोताळा जि. बुलडाणा, दिलीप रामकृष्ण लोखंडे(५९), सुरेश रामकृष्ण लोखंडे (५०) दोघेही रा. हिंगणी बु., ता. तेल्हारा जि. अकोला अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी