खामगावातील काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या ‘गळाला’?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2017 00:22 IST2017-05-18T00:22:05+5:302017-05-18T00:22:05+5:30
खामगाव: खामगावातील एक बडा नेता भारतीय जनता पक्षाच्या ‘गळाला’ लागला असून, लवकरच या नेत्याचा भाजप प्रवेश होणार असल्याची चर्चा शहरात सुरु आहे.

खामगावातील काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या ‘गळाला’?
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: खामगावातील एक बडा नेता भारतीय जनता पक्षाच्या ‘गळाला’ लागला असून, लवकरच या नेत्याचा भाजप प्रवेश होणार असल्याची चर्चा शहरात सुरु आहे. या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आॅक्टोबर २०१४ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत खामगाव विधानसभा मतदार संघात ‘परिवर्तन’ घडले. त्यानंतर खामगाव नगरपालिकेतही परिवर्तनाची लाट आली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. पक्षाच्या होणाऱ्या या पराभवांमुळे काँग्रेस पक्ष सैरभैर असल्याचे चित्र दिसत आहे. आता भारतीय जनता पक्षाने काँगे्रसचा बडा नेता गळाशी लावला आहे. सदर नेत्याच्या भाजप प्रवेशाच्या मुहूर्ताला अद्याप उशीर असला तरी, या महिन्याच्या अखेरीस काँग्रेस पक्षाकडून एकेकाळी शहराध्यक्षपद भुषविलेला हा नेता भाजपवासी होणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. सदर नेता मनाने भाजपवासी झाला असल्याने, प्रवेशाची आता केवळ औपचारिकता शिल्लक असल्याची चर्चा आहे. नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. यापैकी एका नगरसेवकाने भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता माजी शहराध्यक्ष भाजपच्या वाटेवर असल्याचे दिसून येते.
दरम्यान, विद्यमान नगराध्यक्षांचे पती वैभव डवरे यांनी पालिका निवडणुकीच्या तोंडावरच भाजपमध्ये प्रवेश केला होता, हे येथे उल्लेखनीय!