शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

खडकपूर्णा पाणीपुरवठा योजना मार्च २०२० पर्यंत पूर्ण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 14:31 IST

बुलडाणा : शहरासाठी मंजूर असलेली खडकपूर्णा प्रकल्पावरील पाणी पुरवठा योजना मार्च २०२० पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शहरासाठी मंजूर असलेली खडकपूर्णा प्रकल्पावरील पाणी पुरवठा योजना मार्च २०२० पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून येळगाव धरणावरील जलशुध्दीकरण केंद्रांच्या दुरूस्तीबाबत आवश्यक यांत्रिकी, स्थापत्य विषयक सर्व कामे पूर्ण करण्यात येत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलडाणा शहरातील कृत्रीम पाणी टंचाई व दूषित पाणीपुरवठ्याच्या अनुषंगाने मंगळवारी विधानसभेत उपस्थित केलेल्या तारांकीत प्रश्नाच्या लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी ही ग्वाही दिली.बुलडाणा शहरासह सुमारे दीड लाख लोकसंख्येला होणाऱ्या अशुध्द पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावर आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी येळगाव येथील जलशुध्दीरकरण केंद्राच्या दुरावस्थेचा प्रश्न रेटून धरला आहे. निर्ढावलेल्या नगर परिषद प्रशासनाकडून जनतेच्या आरोग्याबाबत महत्त्वपूर्ण असलेल्या या प्रश्नाकडे होणारी डोळेझाक बघता आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वत: च जलशुध्दीकरण केंद्राच्या सफाईची मोहीम हाती घेतली होती. हा विषय पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्यापातळीवर पोहचला होता. बुलडाण्याचे तहसिलदार संतोष शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जलशुध्दीकरण केंद्रांच्या पाहणीसाठी पथक सुध्दा पाठविण्यात आले होते. या पथकाने नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांवर ठपका ठेवीत पालिकेच्या कारभारावर गंभीर ताशेरे ओढले होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोदसिंग दुबे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या तातडीच्या बैठकीत १० जून पर्यंत कारभार सुरळीत करण्याचा अल्टिमेटम नगर परिषद प्रशासनास देण्यात आला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांच्या अध्यक्षतेखाली सुध्दा या प्रश्नावर १४ जून रोजी विशेष बैठक घेण्यात आली. दरम्यान, विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसºया दिवशी आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी तारांकीत प्रश्नाच्या माध्यमातून हा प्रश्न विधीमंडळाच्या पटलावर आणला.त्याअनुषंगाने दिलेल्या लेखी उत्तरात बुलडाणा शहरात अशुध्द पाणीपुरवठा झाल्याची कबुली देत जलवाहिन्यांच्या गळतीमुळे हा प्रकार घडल्याचे सांगितले आहे. त्यासाठी अनुषंगिक दुरूस्ती करण्यात आल्याचे सांगून शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाºया जलशुध्दीकरण केंद्रावरील यांत्रिकी, स्थापत्य कामे व त्यासाठी नवीन उपांगे खरेदी प्रक्रीया इत्यादी बाबी पूर्ण करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी शहरातील अशुध्द पाणी पुरवठा व नादुरूस्त जलशुध्दीकरण केंद्राबाबत यापूर्वी अनेकदा केलेल्या तक्रारींना मुख्यमंत्र्यांनी मान्य करून एकप्रकारे दुजोराच दिला आहे. प्रशासनाच्या भुमिकेवर नाराजीबुलडाणा शहरासाठी मंजूर असलेली ८२.७७ कोटी रूपयांची खडकपूर्णा प्रकल्पावरील पाणी पुरवठा योजना मार्च २०२० पर्यंत पूर्ण करण्यात येईल येईल अशी ग्वाही सुध्दा मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. दरम्यान नगर पालिका प्रशासनाच्या उदासिन भूमिकेमुळे शहरातील अशुध्द व अनियमित पाणी पुरवठ्यावरून संतापलेल्या नागरिकांना आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे दिलासा मिळाला आहे. तसेच शहरातील पाणी पुरवठा व्यवस्थेच्या दुरावस्थेबाबत प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या वेळकाढू भूमिकेबद्दल आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त त्वरीत कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

टॅग्स :khadakpurna prakalpa/sant chokhamela damखडकपूर्णा प्रकल्प/ संत चोखामेळा सागरbuldhanaबुलडाणाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस