बाहेर गप्पा मारत बसलेल्यांची केली कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:36 IST2021-04-20T04:36:11+5:302021-04-20T04:36:11+5:30
उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी, तहसीलदार सुनील सावंत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र साळवे, आरोग्य कर्मचारी हे दुसरबीड येथील लसीकरण ...

बाहेर गप्पा मारत बसलेल्यांची केली कोरोना चाचणी
उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी, तहसीलदार सुनील सावंत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र साळवे, आरोग्य कर्मचारी हे दुसरबीड येथील लसीकरण कार्यक्रमाला भेट देण्यासाठी जात होते. किनगावराजा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देण्यासाठी हे सर्व अधिकारी गावात प्रवेश करीत असताना सार्वजनिक ठिकाणी गप्पा मारत असलेला सात ते आठ जणांचा एक जमाव त्यांना दिसला. सोबत किनगावराजाचे ठाणेदार सोमनाथ पवार होते. त्यामुळे या जमावाला हटकून सोबत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना जमावाची कोरोना चाचणी करण्याच्या सूचना दिल्या. हे ऐकताच आजूबाजूला असलेले लोक पळाले पण या टोळक्याची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. अचानक झालेल्या या प्रकाराने परिसरात गोंधळ उडाला. परंतु या प्रयोगाने लोक विनाकारण रस्त्यावर फिरणार नाहीत हे नक्की. प्रशासनाने मोठ्या गावातील बाजारपेठेत असा प्रयोग केल्यास एकतर जमाव विनाकारण जमणार नाही, तर दुसरीकडे पॉझिटिव्ह असलेले रुग्ण यामुळे आढळून आल्यास मोठ्या प्रमाणावर वाढणारी संख्या आटोक्यात येऊ शकेल.