मतदानाचे प्रमाण किमान ७५ टक्के ठेवा : ई मरिअप्पन

By Admin | Updated: September 25, 2014 01:14 IST2014-09-25T01:13:35+5:302014-09-25T01:14:09+5:30

बुलडाणा येथे मतदार जागृती निरीक्षक ई-मरिअप्पन यांचे अवाहन.

Keep the voting percentage at least 75 percent: e-Mariuphan | मतदानाचे प्रमाण किमान ७५ टक्के ठेवा : ई मरिअप्पन

मतदानाचे प्रमाण किमान ७५ टक्के ठेवा : ई मरिअप्पन

बुलडाणा : प्रसार माध्यमांचा योग्य वापर करुन मतदार जागृती शक्य आहे. बुलडाणा जिल्हयात असणारी २00९ सालची ६९ टक्के मतदानाचे प्रमाण ७५ टक्क्यांपयर्ंत नेण्याचे उद्दीष्ट सर्वांनी ठेवावे असे आवाहन मतदार जागृती निरीक्षक ई-मरिअप्पन यांनी केले. बुलडाणा येथे झालेल्या अधीकार्‍यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधीकारी रमेश घेवंदे, यांची प्रमुख उपस्थिती होती. मरिअप्पन हे जिल्ह्यात दाखल झाल्यापासून त्यांनी आतापर्यंंत चार विधानसभा मतदारसंघांना भेटी दिल्या. एस.एम.एस.आणि ई-मेलच्या माध्यमातून मतदार जागृती करतांना सोशल मिडीया तसेच स्थानिक केबल नेटवर्कचा वापर देखील मतदार जागृतीच्या कामात करावा असे ते म्हणाले. २00९ साली बुलडाणा जिल्हयातील सात मतदारसंघातील मतदानाची सरासरी ६९.५ टक्के होती यंदा ती किमान ७५ टक्क्यांवर नेण्याचे उद्दीष्ट असल्याचे जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी यावेळी सगितले. मतदार जागृतीसाठी लोकसभा निवडणूकीच्या काळात राजस्थानी युवा मंच या स्वयंसेवी संस्थेने मदत केली होती. या ही वेळी सुध्दा सदर संस्था मदत करणार आहे. संस्थेचे अँड.जितेंद्र कोठारी आणि पप्पू अग्रवाल यांनी या बैठकीत ही माहिती दिली. या कामात कवी अजीम नवाज राही हे मदत करणार आहेत. मतदार जागृतीसाठी मतदानाच्या पाच दिवस आधी मतदारांसाठी पोलचिट वाटप करण्यात येणार असून अधिकाधिक जणांनी मतदानासाठी बाहेर पडावे यासाठी अंगणवाडी सेविका, गटसचिव यांचे सहकार्य घेण्यात येत आहे

Web Title: Keep the voting percentage at least 75 percent: e-Mariuphan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.